धडाकेबाज आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी रविवारी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. त्यावरून त्यांना जबरदस्त ट्रोल केले जातेय. ‘न्यूज डंका’चे मुख्य संपादक दिनेश कानजी यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत समीर वानखेडे म्हणाले, ‘मी लहानपणी संघाच्या शाखेत जात होतो, माझ्या मुलांवरही हे संस्कार व्हावेत, अशी माझी इच्छा आहे. मी रेशीमबागेत गेलो, त्यावरून इतकी ओरड होण्याची गरज काय? मी हिजबुल मुजाहीदीनच्या कँपमध्ये गेलो नव्हतो…’ वाचा सविस्तर मुलाखत.
तुम्ही नागपूरमध्ये संघ मुख्यालयात गेलात म्हणून खूप चर्चा होते आहे?
चर्चा झाली तर होऊ दे, संघाचे माझे जुने संबंध आहेत. मी शिवडीत राहात असताना बालपणी संघाच्या शाखेतही जायचो. माझ्या मुलांवरही हेच संस्कार व्हावे असे मला वाटते.
तुम्ही डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरूजी यांच्या स्मृतीस्थळाही भेट दिलीत?
त्यात काय चूक आहे? ही दोन्ही खूप मोठी व्यक्तिमत्व आहेत. देशाच्या जडणघडणीत त्यांची भूमिका मोठी आहे. त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नमन करण्याची माझी आणि क्रांतिची इच्छा होतीच. बऱ्याच वर्षांनी ती पूर्ण झाली. खरं तर मला उशीर झाला असं म्हणायला हरकत नाही. हे दोघे महापुरुष माझे आदर्श आहेत.
हे ही वाचा:
राष्ट्रीय महिला कबड्डीसाठी महाराष्ट्राचे नेतृत्व पूजा यादवकडे
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक
रौप्यमहोत्सवी वर्षाला डोंबिवलीत ‘वसुधैव कुटुंबकम’ची गुढी
भारतातील ३० कोटी गाड्यांपैकी अर्ध्या गाड्यांचा विमाच नाही!
कसा काय अनुभव होता?
उत्तम! मी संघाच्या ज्यष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तेथील वाचनालयात गेलो. संघ कार्य, क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यातील योगदान, आपले इतिहास पुरूष अशा विषयांवर भरपूर पुस्तकंही विकत घेतली. इथल्या वातारणात प्रचंड सकारात्मकता मला जाणवली.
पण संघ मुख्यालयात भेटीमुळे तुमच्यावर टीका सुरू झाली आहे, त्याचे काय?
होऊ दे की, माझ्यावर आजवर टीका केली ते कोण आहेत? सध्या कुठे आहेत? हे सगळ्यांना माहिती आहे. मी डोंगरीत असताना दाऊदची टोळी उद्ध्वस्त केली, दाऊदच्या भावाला अटक केली, त्याचे साथीदार माझ्यावर टीका करणारच.
संघ मुख्यालयाच्या भेटीमुळे तुम्ही राजकारणात प्रवेश करणार अशी चर्चा आहे ?
मी कधी कोणत्याही चर्चेला घाबरलो नाही. मी सध्या जी सरकारी नोकरी करतोय ती, माझ्या दृष्टीने देशसेवेचे माध्यम आहे. राजकारण हेही देशसेवेचे माध्यम आहे. देशाची सेवा तुम्ही कोणत्याही क्षेत्रात राहून करू शकता.
म्हणजे तुम्ही राजकारणात जाण्याचे मन बनवले आहे तर?
उद्या काय होईल हे जगात कोणीच सांगू शकत नाही. मी ठरवून आयआरएस झालो, पण त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आयुष्यात घडल्या ज्या ठरवल्या नव्हत्या, पण झाल्या. उद्या न जाणो राजकारणातही जाईन. पण या क्षणी तसे काहीच नाही. समीर वानखेडे (अतिरीक्त आय़ुक्त, डीजीटीएस, चेन्नई)