समीर वानखेडे यांनी घेतले बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन आणि म्हणाले…

समीर वानखेडे यांनी घेतले बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन आणि म्हणाले…

गुरुवार, १४ एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आहे. त्यामुळे त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरमधील चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी झाली होती. चैत्यभूमी येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे माजी झोनल डायरेक्टर (मुंबई) आणि आय.आर.एस. अधिकारी समीर वानखेडे हे देखील आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते.

समीर वानखेडेंनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सर्वप्रथम त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी तरुणांना आवाहन केले की, ‘बाबासाहेब आंबेडकरांना आपलं आदर्श माना आणि त्यांनी केलेला संघर्ष, सिद्धांत यांचे पालन करा.” आंबेडकर कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेजमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर व्याख्यान ठेवण्याचे त्यांनी यावेळी सुचवले. नवाब मलिकांच्या जप्त झालेल्या संपत्तीबाबत समीर वानखेडे यांना प्रश्न विचारण्यात आला. मात्र, याबाबत त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

हे ही वाचा:

दिवाळखोरी आणि परकीय चलन

एनसीबी मुंबई विभागाच्या संचालक पदी अमित घावटे

‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणीच्या तपासातून संभाषण पोलिसांच्या हाती

गुणरत्न सदावर्ते सातारा पोलिसांच्या ताब्यात

मुंबईतील कॉर्डिलिया क्रुझवर समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबी पथकाने छापा टाकत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर काही जणांना अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळून मोठा वाद निर्माण झाला होता. यानंतर समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते.

Exit mobile version