‘ज्यांची मुले ड्रग्जचे सेवन करतात, त्यांच्या पालकांबद्दल वाईट वाटते’

समीर वानखेडे यांची कबुली

‘ज्यांची मुले ड्रग्जचे सेवन करतात, त्यांच्या पालकांबद्दल वाईट वाटते’

अंमली पदार्थ विरोधी पथकाचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्याविरोधातील अमली पदार्थ प्रकरणाच्या तपासमोहिमेचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्यांनी ज्यांची मुले अमली पदार्थांचे सेवन करतात, त्यांच्याबद्दल मला वाईट वाटत असल्याचे नमूद केले.

वानखेडे हे युट्युब वाहिनी ‘लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. ऑक्टोबर २०२१मध्ये वानखेडे यांनी कोर्डेलिआ क्रूझवर अमली पदार्थांप्रकरणी छापा टाकला होता. त्यावेळी त्यांनी अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी आणि त्याचे सेवन केल्याप्रकरणी आर्यन खान याला अटक केली होती. मे, २०२३मध्ये समीर वानखेडे यांनी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात शाहरुख खान याच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषण नमूद केले होते.

हे ही वाचा:

ईशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे बीसीसीआयचे वार्षिक कंत्राट रद्द

कन्फर्म… ठाकरे गटाचे बडगुजर सलीम कुत्तासोबत नाचत होते!

तृणमूलचा नेता शेख शहाजहान याला अखेर अटक

मध्य प्रदेशात पिकअप पलटून १४ जणांचा मृत्यू

या संभाषणात शाहरुख खान हा वानखेडे यांच्याकडे याचना करत असून आर्यनविरोधात नरमाईची भूमिका घ्यावी, अशी विनंती करत असल्याचे नमूद केले आहे. मात्र याबाबत काहीही बोलण्यास त्यांनी नकार दिला. ‘मी याबाबत काहीही बोलणार नाही. परंतु जेव्हा मी अंमली पदार्थाशी संबंधित कोणावरही कारवाई करतो, तेव्हा मला त्यांचे पालक आणि आईवडिलांविषयी वाईट वाटते. त्या व्यक्तीला पुनर्वसन केंद्रात पाठवणे गरजेचे आहे, असे वाटते,’ असे वानखेडे म्हणाले.

‘आम्ही एकदा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या महिला दलालाला पकडले होते. तिला किशोरवयीन मुले होती. अशा प्रकारची प्रकरणे पाहिली की वाईट वाटते. परंतु आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडावेच लागते,’ असे वानखेडे म्हणाले. आर्यन खान याची सुटका करण्यासाठी वानखेडे यांनी शाहरुख खान यांच्याकडून २५ लाखांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

Exit mobile version