छळ होत असल्याबद्दल समीर वानखेडे गेले अनुसूचित जाती आयोगाकडे

छळ होत असल्याबद्दल समीर वानखेडे गेले अनुसूचित जाती आयोगाकडे

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्याकडून होत असलेल्या छळामुळे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीला अनुसरून या आयोगाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

त्या अनुषंगाने या आयोगाने गृहमंत्रालयाचे सचिव, मुख्य सचिव महाराष्ट्र सरकार, पोलिस महासंचालक महाराष्ट्र सरकार आणि पोलिस आयुक्त मुंबई यांना पत्र पाठवून कृती अहवाल पाठविण्याची विनंती केली आहे. येत्या ७ दिवसांत यासंदर्भात हा अहवाल सादर करायचा आहे.

आयोगाने या चारही जणांना पत्र पाठवून जर निर्धारित वेळेत अहवाल प्राप्त झाला नाही तर न्यायालयाचा मार्ग अनुसरण्याचा इशारा दिला आहे. घटनेतील ३३८ कलमानुसार ही बाब न्यायालयात नेली जाईल आणि त्यावेळी या चारजणांना व्यक्तिगत किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या रूपात न्यायालयात हजर राहावे लागेल, असेही पत्रात म्हटले आहे.

हे पत्र २६ ऑक्टोबरला समीर वानखेडे यांच्याकडून आयोगाला मिळाले आहे. त्यावर आता या कृती अहवालात तक्रारदाराची माहिती, आरोपीची माहिती, नोंदविलेल्या एफआयआरची माहिती, आरोपींची आणि अटक झालेल्या आरोपींची माहिती, पीडिताला देण्यात आलेल्या नुकसानभरपाईची माहिती नमूद करायची आहे.

 

हे ही वाचा:

सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिकेत वॉर्ड रचना

त्या ‘दाढीवाल्या’ने नवाब मलिकना विचारला जाब

आर्यन खानला पाळाव्या लागणार ‘या’ १४ अटी

आर्यन खान आज रात्रीही तुरुंगातच

 

समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर केलेल्या छापेमारीनंतर त्यांच्या या छापेमारीबद्दल मंत्री नवाब मलिक यांनी संशय व्यक्त करत वेगवेगळे आरोप करण्यास प्रारंभ केला. समीर वानखेडे हे अनुसूचित जातीचे नसून मुस्लिम आहेत, त्यांचे वडील मुस्लिम आहेत, त्यांचा विवाह मुस्लिम मुलीशी झालेला आहे त्यातही ते मुस्लिम आहेत असे दाखविण्यात आले आहे, त्यांनी नोकरीसाठीही खोटी कागदपत्रे दिली असतील असा संशय आहे, असे विविध आरोप करण्यास प्रारंभ केला. त्यावर वानखेडे कुटुंबियांनीही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला पण अखेर समीर वानखेडे यांनी आयोगाकडेच दाद मागितली आहे.

Exit mobile version