एच वॉर्डच्या वतीने तालुका स्तरावरील विज्ञान प्रदर्शन नुकतेच पार पडले त्यात आयईएस ज्युनियर कॉलेजचे शिक्षक समीर मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकाळजे (प्रयोगशाळा सहाय्यक) यांच्या विज्ञान प्रकल्पाला द्वितीय पारितोषिक मिळाले. या कामगिरीसह त्यांना झोनल पातळीवर आपली कामगिरी दाखविण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
शौर्य आडाव व हिरम खान या दोन विद्यार्थ्यांच्या गणितीय प्रकल्पाला तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
हे ही वाचा:
सामनाच्या संपादकपदी रामसे ब्रदर्स?
शिवसेनेत फूट नाहीच; सिब्बल यांचा दावा तर जेठमलानी म्हणाले, पक्षातून बाहेर पडणे बेकायदेशीर कसे?
जोशीमठमधील हॉटेलनंतर आता घरे पाडण्याचा निर्णय
पदयात्रेत राहुल गांधींच्या गळ्यात एकाने घातले हात
या प्रदर्शनात ८० शाळांनी भाग घेतला होता. विज्ञान व गणितीय अशा दोन्ही विषयांसाठी डॉ. होमी भाभा अणुसंशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रवी सिंग यांच्या हस्ते ही पारितोषिके देऊन स्पर्धकांना गौरविण्यात आले.
त्यावेळी कॉलेजच्या प्रभारी डॉ. ममता सिंग, हजारी मॅडम, प्रीतम मॅडम उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व गणित या विषयांची आवड निर्माण करण्याचे कौशल्य या प्रकल्पातून प्राप्त झाले आहे. सर्व तालुकास्तरातून कॉलेजने मिळविलेल्या या यशाचे कौतुक होत आहे.