महाराष्ट्राची हास्यजत्रातून सर्वांच्या घराघरात पोहोचलेला समीर चौघुले आता तरुणांच्या ‘अंगाखांद्यावर खेळणार’ आहे. महाराष्ट्राला हसविणाऱ्या या कार्यक्रमात समीर चौघुलेचे काही पंचेस चांगलेच गाजले आहेत. त्याच पंचेसचा उपयोग करून टी-शर्ट बाजारात आणण्यात आले आहेत. त्या टी-शर्टवर त्याचे हे पंचेस लिहिण्यात आले असून ते आता महाराष्ट्रभर लोकप्रिय होतील.
हास्यजत्रात समीर चौघुले आणि शिवाली यांच्यातील संवादात शिवाली, हे खरंय??? असा एक पंच नियमित असतो. त्यावर महाराष्ट्र खळखळून हसला आहे. किंवा विशाखा सुभेदारसह त्याची केमिस्ट्री भलतीच रंगली आहे. तिच्याशी बोलताना अनेकवेळा तो ‘मोठ्ठी’ असा शब्द वापरून हशा-टाळ्या मिळवितो. हा शब्दही टी-शर्टवर वेगळ्या ढंगात लिहून तो टी-शर्ट बाजारात आणण्यात आला आहे.
अनेक स्कीटमध्ये तो दरवाजाच्या चौकटीतून घरात प्रवेश करतानाचा प्रसंग असतो तेव्हा घराच्या बेलचा एक विशिष्ट आवाज आज महाराष्ट्राला परिचित झाला आहे. पुच, पुच, पुच असा आवाज काढून घराच्या बेलचा आवाज समीर अस्खलित काढतो. त्याची ही खुबीही टी-शर्टवर उमटली आहे. त्याचे हे टी-शर्ट ५५० रुपयांना असून महाराष्ट्रातील तरुणाईच्या उड्या या टी-शर्टवर नक्कीच पडणार आहेत.
समीर चौघुलेने आपल्या फेसबुक पेजवर हे टी-शर्ट घातलेले फोटो टाकले आहेत. त्यात शिवाली आणि निमिष असे दोघेही दिसतात. त्यामुळे लवकरच हे टी-शर्ट लोकप्रिय होणार आहेत.
हे ही वाचा:
भारतातील आर्थिक जाळे जर्मनी, चीनपेक्षा मोठे
नवाब मलिकांना न्यायालयाने झापले; ट्विटरवर उत्तरे देता, इथेही द्या!
पालकमंत्री म्हणून मला क्रूझवर बोलावले होते, पण मी गेलो नाही!
‘एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला’
महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सध्या महाराष्ट्रभर लोकप्रिय आहे. समीर चौघुलेसह, प्रभाकर मोरे, विशाखा सुभेदार, निमिष कुलकर्णी, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, ओंकार भोजने, चेतना भट, वनिता खरात, पृथ्विक प्रताप, गौरव मोरे, श्याम राजपूत, अरुण कदम, पंढरीनाथ कांबळे, ओंकार राऊत, निखिल बने, दत्तू मोरे या कलाकारांनी धमाल उडविली आहे.