उत्तर प्रदेशातील संभल येथील शाही जामा मशिदीजवळ बांधण्यात येत असलेल्या पोलीस चौकीची जमीन वक्फ मालमत्ता असल्याचा दावा करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा दावा खोटा ठरवला आहे. या संदर्भात एसपी कृष्णा बिश्नोई यांनी पत्रकार परिषद घेत वक्फचा दावा फेटाळून लावला. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जामा मशिदीच्या सर्वेक्षणा दरम्यान मुस्लीम जमावाने आंदोलन करून पथकावर दगडफेक केली होती. परिसरातील अनेक गाड्या जमावाने जाळल्या होत्या. या हिंसाचारात चार लोकांचा मृत्यू झाला तर अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर परिसरात शांततेचे वातावरण राहण्यासाठी याठिकाणी पोलीस चौकी बांधण्याचा प्रस्ताव आला. त्यानंतर नव्या पोलीस चौकीचे बांधकाम सुरु झाले. मात्र, अशातच वक्फने दावा केला की, वक्फच्या मालमत्तेवर नवी पोलीस चौकी बांधण्यात येत आहे. अलीकडेच AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही अशा दाव्यांवर वक्तव्य केले होते.
पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वक्फचा हा दावा खोटा ठरवला. एसपी कृष्णा बिश्नोई यांनी सांगितले, याबाबत काही कागदपत्रेही एका शिष्टमंडळाने दिली होती आणि त्या कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. तपासादरम्यान कोणत्याही कागदपत्रांची नोंद झाल्याचे समोर आले नाही. कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा लोकांवर कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
हे ही वाचा :
रस्त्यावरच्या खड्ड्यामुळे मृत झालेला रुग्ण झाला जिवंत!
बांगलादेशी-रोहिंग्यांच्या मुद्द्यावर उबाठाची गोची?
अमेरिका हल्ल्यातील संशयित आयएसआयएसशी संबंधित; अमेरिकेच्या लष्करातही केले होते काम
मदरशाच्या नावाखाली मुबारक अलीकडून खोट्या नोटा छापण्याचे काम!