26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषशिवस्मारकाविरोधात जाणारे काँग्रेस प्रचारक वकील कोण?, हे संभाजी राजेंनी बघावं!

शिवस्मारकाविरोधात जाणारे काँग्रेस प्रचारक वकील कोण?, हे संभाजी राजेंनी बघावं!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल

Google News Follow

Related

छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक अरबी समुद्रात बांधण्यात येणार आहे. २०१६ साली जलपूजनही झाले मात्र, अद्याप महाराजांच्या पुतळ्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. यावरून छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नेते छत्रपती संभाजी महाराज यांनी संताप व्यक्त केला. पुतळ्याच्या पाहणीकरिता आज आपल्या कार्यकर्त्यांसह गेट वे ऑफ इंडिया परिसरात दाखल होत सरकारवर टीका करत पुतळ्यावरून केंद्र आणि राज्य सरकारवर प्रश्न उपस्थित केले. छत्रपती संभाजी महाराजांच्या या प्रश्नाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. शिवस्मारका विरोधात कोर्टात जाणारे कोण?, ते वकील कोण?, हे संभाजी राजेंनी बघायला हवे, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक झाले पाहिजे, ही तमाम शिवभक्तांची इच्छा आहे. केवळ स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण?, ते कोणाचे वकील आहेत?, हे पण संभाजी राजेंनी बघितलं पाहिजे.

हे ही वाचा : 

दिल्लीनंतर अमृतसरमध्ये १० कोटी रुपयांचे कोकेन जप्त!

गोवा सरकार ख्रिश्चन समुदायाच्या दबावाखाली ?

मिरा भाईंदर, वसई विरारमध्ये दोन वर्षांत ३२३७ महिला बेपत्ता

‘श्रेष्ठ महाराष्ट्र–विकसित महाराष्ट्रा’च्या संकल्पनासाठी राज्यात ‘सजग रहो’ अभियान!

ते पुढे म्हणाले, काँग्रेस पक्षाचा अधिकृत प्रचार करणारे वकील, हे कोर्टात जाऊन छत्रपती शिवरायांचे स्मारक होवू नये म्हणून स्थगिती आणतात, त्यामुळे त्यांचाही योग्य शब्दात निषेध संभाजी राजेंनी केला पाहिजे. स्मारकासाठी आम्ही कोर्टात भांडत आहोत आणि ते मंजूर करून घेवू, असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

दरम्यान, शिवस्मारकाच्याविरोधात पर्यावरणवाद्यांनी कोर्टात धाव घेतल्यानंतर हे प्रकरण कोर्टात प्रलंबित आहे. विशेष म्हणजे शिवस्मारकाविरोधात लढणारे वकील असीम सरोदे आहेत, ज्यांचे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारकांच्या यादीत नाव होते. छत्रपती शिवरायांच्या स्मारकामुळे पर्यावरणाला कोणताच धोका होणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र राज्यसरकारने केंद्रीय हरित लवादाला पाठवले होते, मात्र बांधकामामुळे समुद्रातील जैवविविधतेला धोका निर्माण असल्याचे कारण देत पर्यावरणवादी आणि मच्छीमारांनी नाराजी व्यक्त करत हरित लवादात याचिका दाखल केली आणि याचिकाकर्त्यांचे वकील असीम सरोदे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा