संभाजी ब्रिगेडच्या कामगार संघटनेने मंत्रालयात पत्रके भिरकावली!

पुन्हा एकदा मंत्रालय सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह

संभाजी ब्रिगेडच्या कामगार संघटनेने मंत्रालयात पत्रके भिरकावली!

मागील काही दिवसांपासून मंत्रालयात आंदोलनाच्या घटना वारंवार घडत आहेत.अमरावती येथील धरणग्रस्त नागरिकांनी मागील महिन्यात मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर उडी मारून आंदोलन केले होते.त्यानंतर काही दिवसात एका शिक्षकाकडून देखील तसाच प्रयत्न करण्यात आला.त्यातच आज दि.१३ ऑक्टोबर रोजी मुबईतील संभाजी ब्रिगेड कामगार संघटेनच्या कामगारांनी मंत्रालयात प्रवेश करत पत्रके भिरकावत आंदोलन केले.मंत्रालयात प्रवेश करण्याऱ्या अभ्यागतांची पोलीस कर्मचारी कडक तपासणी करत आहेत.मात्र, संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेकडून करण्यात आलेल्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा मंत्रालय सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागात करण्यात येणारी कंत्राटी भरती तसेच मुंबई महानगर पालिकेतील विविध विभागात कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना समान वेतनाचा लाभ मिळावा यासह अनेक मागण्यासाठी संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेकडून आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आले.या प्रकरणी पोलिसांकडून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

हे ही वाचा:

भारत- पाक सामना बघायला जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेकडून विशेष ट्रेन

एलॉन मस्क यांचा हमासवर ‘हल्ला’

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांची दीडशे कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

मद्यधुंद निवृत्त जवानाने राजधानी एक्स्प्रेसमध्ये झाडली गोळी

संभाजी कामगार संघटनेच्या विविध मागण्या
महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागाकडून कंत्राटी भरतीला कामगार संघटनेचा विरोध आहे.मुंबई महानगरपालिकेतील २४ विभागातून संकलन करण्यात आलेला कचरा डंपिंग पर्यंत पोहचवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पी एफ/ ई.एस.आय.सी. किमान वेतनसह पीएल,सीएल,ईएल,राष्ट्रीय सुट्टी,तसेच इतर भर पगारी सुट्या अशा विविध मागण्या संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या मागण्या आहेत.आपल्या मागण्यांकरिता संभाजी ब्रिगेडच्या लोकांचे आंदोलन मुंबईतील आझाद मैदान येथे २ ऑक्टोबर पासून सुूरू आहे.

संभाजी ब्रिगेड कामगार संघटनेच्या लोकांनी आज मंत्रालयात प्रवेश करून मंत्रालयातील पहिल्या मजल्यावर सरकार विरोधात घोषणाबाजी केली व पत्रके भिरकावली. या प्रकरणी पोलिसांकडून सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.प्रमोद शिंदे ,श्रीकांत गिरी,पल्लवी पाटील,प्रशांत मेढे, निशा शेख,महेश मोरे,पूनम शिंदे असे ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागाचे खाजगीकरण राज्य सरकार करत आहे.आता पोलीस भरतीमध्ये सुद्धा महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून ११ महिन्यासाठी जवान (MSF ) कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय राज्य सरकार कडून घेण्यात आला.सरकारच्या या भूमिकेला विरोधकांकडून विरोध करण्यात येत आहे.

 

 

Exit mobile version