‘वीज चोरी’ प्रकरणी समाजवादी पक्षाचे (एसपी) खासदार झिया उर रहमान बर्क यांना उत्तर प्रदेश वीज विभागाने शुक्रवारी (२० डिसेंबर) १.९१ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. संभलच्या दीपा सराई भागातील त्यांच्या निवासस्थानी वीजचोरी केल्याचा आरोपानंतर झिया उर रहमान बर्क खासदाराविरुद्ध गुरुवारी पोलिसांत गुन्हा दाखल. यानंतर वीज विभागाने कारवाई करत त्यांना नोटीस बजावली.
विजेच्या मीटरमध्ये छेडछाड झाल्याच्या संशयावरून वीज विभागाच्या अधिका-यांनी पोलीस बंदोबस्तात बर्क यांच्या घरावर छापा टाकला. तपासणीदरम्यान दोन मीटरमध्ये अनियमितता आढळून आली. एअर कंडिशनर, छतावरील पंखे आणि इतर विद्युत उपकरणांचा वापर करूनही बर्क यांचे गेल्या वर्षभरातील वीज बिल शून्य वापर असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी वीज विभागाने कारवाई करत सपा खासदाराच्या वीज कनेक्शन कापले आहे.
दरम्यान, गुरुवारी १९ डिसेंबर रोजी पहाटे वीज विभागाचे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह झिया उर रहमान बर्क यांच्या घरी पोहोचले होते. पथकाकडून खासदारांच्या निवासस्थानी विजेबाबत तपासणी करण्यात आली. यावेळी खासदार झिया उर रहमान बर्क यांच्या वडिलांनी वीज विभागातील लोकांना धमकावल्याची माहिती आहे. ‘आमचे सरकार आले तर बघून घेऊ’ अशी धमकी त्यांनी दिल्याचा आरोप केला जात आहे. विद्युत विभागाने कारवाई करत झिया उर रहमान बर्क यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. तसेच वीज चोरीविरोधी कलम १३५ अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा :
जयपूरमध्ये एलपीजी टँकरचा स्फोट, ८ जणांचा होरपळून मृत्यू!
‘नीलकमल’च्या अपघातानंतर जाग; बोट प्रवासासाठी लाइफ जॅकेट अनिवार्य!
सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर मानवी चुकीमुळे कोसळले!
अयोध्येत राम मंदिर बांधल्यानंतर नवीन स्थळांबद्दल मुद्दा उपस्थित करणे अमान्य