उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराच्या मुलीने पक्षाच्या विद्यमान आमदारावर बलात्कार आणि ब्लॅकमेल केल्याचा आरोप केला आहे. दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी सपा नेता आसिफ अली याने पिडीतेवर ५ वर्षे बलात्कार केला. त्याने तिच्या खाजगी फोटोंचा वापर करून तिला ब्लॅकमेल केले आणि महिलेकडून ६ कोटी रुपये उकळले याशिवाय, त्याने तिला अंगावर ॲसिड टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या भावासह चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भास्करच्या वृत्तानुसार, मंगळवारी (७ मे) रोजी रात्री पीडितेने तिच्या पतीला आपला त्रास सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यांनी आरोपीविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा..
शरियानुसार पेन्शन द्या, इस्रायलशी संबंध तोडा…मुस्लिम गटाच्या ब्रिटनमध्ये मागण्या
शरद पवार म्हणतात, उद्धव ठाकरे हे आमच्या विचारांचेच आहेत!
ऍस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून करोना लस मागे घेणार!
हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!
पीडित महिला मुरादाबादच्या सिव्हिल लाइन्स परिसरात राहते. यूपीए सरकारच्या काळात तिच्या आजोबांनी संसदेत प्रमुख पद भूषवले होते. तर तिचे वडील दोन वेळा आमदार राहिलेले आहेत. पीडितेला दोन बहिणी असून भाऊ नाही. तिचे लग्न ११ वर्षांपूर्वी कानपूरमधील एका व्यावसायिकाशी झाले होते. तिच्या लग्नाला समाजवादी पक्षाचे संस्थापक-संरक्षक मुलायम सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. पीडित मुलीच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. मुलगा नसल्यामुळे, केवळ मुलींनाच त्याच्या मालमत्तेवर मालकी हक्क आहे आणि पीडितेसोबत जे काही घडले ते प्रामुख्याने वारसाहक्कातील तिच्या वाट्यामुळे घडले आहे.
पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, २०१९ मध्ये ती तिच्या आजारी वडिलांची काळजी घेण्यासाठी तिच्या माहेरच्या घरी गेली तेव्हा या प्रकाराला सुरुवात झाली. जिगर कॉलनीतील तिकोनिया पार्कजवळ राहणारा आसिफ अली उर्फ शिबली चौधरी हा तिच्या वडिलांना भेटायला जायचा. २०१९ मध्ये तिचे वडील आजारी पडल्यावर ती माहेरी आली. ४ एप्रिल २०१९ रोजी आसिफने तिला कोल्ड्रिंकमध्ये नशेचा पदार्थ मिसळून दिला. बेशुद्ध अवस्थेत त्याने बलात्कार केला. नग्न फोटोही क्लिक केले. या फोटोचा वापर करून तो तिला सतत ब्लॅकमेल करत होता.
ती शुद्धीवर आल्यानंतर तिला लक्षात आले कि आपल्याबरोबर काहीतरी चुकीचे घडले आहे. तेव्हा आसिफ अलीने तिला, तिची नग्न छायाचित्रे दाखवली आणि त्याने तिला सांगितल्याप्रमाणे न केल्यास ती सोशल मीडियावर लीक करण्याची धमकी दिली. कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने पीडितेने त्याच्या मागण्या मान्य केल्या. पीडितेने सांगितले की, असिफ अलीने तिला अनेक कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी जबरदस्ती केली आणि धमकावले. त्याने मला धमकावून अनेक कागदपत्रांवर सह्याही करून दिल्या. एवढेच नाही तर तो तिला नशेच्या अवस्थेत कोर्टात घेऊन गेला. तिथे त्याने अनेक कागदपात्रांवर सह्या करून घेतल्या.
तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्यानंतर आसिफने तिचा आर्थिक फायदाही घेतला. त्याची नजर तिच्या वडिलांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेवर होती. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याकडून तीन कोटी रुपये उकळले. त्याने खरेदी केलेल्या सुपरटेकमधील फ्लॅटची संपूर्ण रक्कम तिने भरली. २०२३ मध्ये पीडितेने तिचे वडील गमावले. त्याच्या मृत्यूनंतर, आसिफ अलीने जबरदस्तीने तिच्या वडिलांकडून मिळालेला पेट्रोल पंप त्याच्या नावावर हस्तांतरित केला. वडिलांचे २०२३ च्या शेवटी निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर तिने आसिफला छायाचित्रे हटवण्याची विनंती केली, पण त्याने ऐकण्यास नकार दिला. फोटो डिलीट करण्याच्या बदल्यात त्याने आणखी ३ कोटी रुपयांची मागणी केली. वडिलांकडून मिळालेला पेट्रोल पंप त्यांच्या नावावर नोंदवण्यासाठी त्याने दबाव आणण्यास सुरुवात केली,” असे महिलेने तिच्या तक्रारीत लिहिले आहे.