काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी

डॅलास येथे मुलाखतीदरम्यान हिसकावून घेतला होता फोन

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केलेल्या पत्रकाराची सॅम पित्रोदांनी मागितली माफी

डॅलास, टेक्सास येथे राहुल गांधी यांच्या दौऱ्यापूर्वी इंडिया टुडेचा पत्रकार रोहित शर्माला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या असभ्य वागणुकीबद्दल आता इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी माफी मागितली आहे.

रोहित शर्मानेच ही माहिती दिली की, सॅम पित्रोदा यांनी फोन करून माफी मागितलेली आहे. घडलेल्या या घटनेबद्दल त्यांनी आपल्याला खेद असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी या पत्रकाराला दिले आहे. पत्रकारांवर असे हल्ले हे खपवून घेतले जाणार नाहीत, असेही पित्रोदा यांनी रोहित शर्माला म्हटले आहे.

रोहित शर्मा हे अमेरिकेत इंडिय़ा टुडेचा पत्रकार म्हणून काम पाहात आहे. डॅलास येथे त्याच्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्याचा फोन हिसकावून घेत पित्रोदा यांची मुलाखत डीलिट केली होती. या प्रकरणामुळे काँग्रेसच्या लोकशाहीवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवादी मुखवटा फाटल्याचा आरोप करण्यात आला.

हे ही वाचा:

‘हिजाब-बुरखा’ घाला नाहीतर बांगलादेश सोडा !

मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावाने बोगस अटकेच्या नोटीस

ज्ञानेश महारावांवर गुन्हा दाखल करा

ख्रिश्चन धर्मीयांकडून गणपती विसर्जनाच्या वाटेत ‘मिरचीची धुरी’

रोहित शर्माने पित्रोदा यांच्या मुलाखतीदरम्यान विचारले होते की, बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांबाबत राहुल गांधी यांची काही भूमिका आहे का आणि ते अमेरिकेतील संसद सदस्यांशी या विषयावर बोलणार आहेत का, त्यावर पित्रोदा म्हणाले होते की, ते राहुल गांधी आणि अमेरिकन संसद सदस्य यांच्यातला मुद्दा आहे. मी त्यावर बोलू शकत नाही. तेव्हाच तिथे उपस्थित असलेल्या ओव्हरसीज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रोहित शर्माचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यातील मुलाखत काढून टाकली.

त्याची बातमी भारतात आल्यानंतर त्यावरून काँग्रेसच्या प्रवृत्तीवर टीका होऊ लागली. रोहित शर्माने याबाबत म्हटले की, माझ्या शेवटच्या प्रश्नाने सारे चित्रच बदलून टाकले. हा प्रश्नच वादग्रस्त आहे, असा आरडाओरडा काही लोक करू लागले. नंतर इतरांचेही आवाज त्यात मिसळले. राहुल गांधी यांच्या कार्यकर्त्यांनी माझा फोन हिसकावून घेतला.

रोहित शर्मांना जेव्हा पित्रोदा यांचा फोन आला तेव्हा त्यांनीही या घटनेबद्दल आपल्याला धक्का बसल्याचे सांगितले. तसेच जे या हल्ल्याला जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

 

Exit mobile version