स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्या मोमिकला घातल्या गोळ्या!

पोलिसांकडून तपास सुरु

स्वीडनमध्ये कुराण जाळणाऱ्या मोमिकला घातल्या गोळ्या!

इस्लामचा तीव्र टीकाकार आणि अनेक वेळा सार्वजनिकरित्या कुराण जाळणारा सलवान मोमिक याची हत्या करण्यात आली आहे. स्वीडनमध्ये सलवान मोमिकावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सलवान मोमिकने २०२३ मध्ये अनेक वेळा कुराणच्या प्रती जाळल्या होत्या. या घटनेनंतर अनेक मुस्लिम देशांनी संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली होती. सलवान हा इराकी वंशाचा ख्रिश्चन नागरिक होता. स्वीडिश मीडियानुसार, स्टॉकहोमजवळील एका शहरात झालेल्या गोळीबारात सलवान मोमिकचा मृत्यू झाला.

स्टॉकहोम जिल्हा न्यायालयाने सांगितले की, सलवान मोमिकविरुद्ध एका खटल्याचा निकाल दिला जाणार होता, मात्र आरोपीचा मृत्यू झाल्यामुळे निकाल पुढे ढकलण्यात आला. न्यायालयाचे न्यायाधीश गोरान लुंडाहल यांनी मृत व्यक्ती सलवान मोमिका असल्याची पुष्टी केली. दरम्यान, सलवान मोमिकाचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री स्टॉकहोमजवळील सॉडरटाल्जे येथे गोळीबार झाल्याची माहिती मिळाली होती. घटनास्थळी दाखल होताच एक व्यक्ती बंदुकीच्या गोळीने जखमी झालेल्या अवस्थेत आढळला. मात्र, नंतर त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे, असे पोलिसांनी सांगितले.

हे ही वाचा : 

ब्रिटन दोन दशकांत मुस्लिम कट्टरतावादाच्या हाती जाण्याची शक्यता

ट्रम्प यांनी अमेरिकेची परकीय मदत थांबवली

काँग्रेस खासदार राकेश राठोडला पत्रकार परिषदेतूनच पोलिसांनी उचलले!

छत्तीसगडः सात महिलांसह २९ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

दरम्यान, सलवान मोमिका हे इराणच्या लष्कराचे माजी अधिकारी होते. पुढे ते इस्लामचे सर्वात मोठे टीकाकार बनले. जून २०२३ मध्ये सलवान मोमिका यांनी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीसमोर कुराण जाळले, ज्याचा व्हिडिओ आणि फोटो सर्वत्र व्हायरल झाले होते.

मंदिराने नियम केले; कुणाचे पोट दुखले ?| Mahesh Vichare | Siddhi Vinayak Temple |

Exit mobile version