हे मातृभूमी,
तुजसाठी मरण ते जनन;
तुजवीण जनन ते मरण
स्वातंत्र्यसैनिक, वकील, लेखक, समाजसुधारक आणि हिंदुत्ववादी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज पुण्यतिथी. स्वातंत्र्यवीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे नेते होते. लहानपणापासूनच सावरकरांना देशप्रमाची आवड होती.
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ रोजी भागलपूरच्या नाशिक जिल्ह्यातील एका सामान्य कुटुंबात झाला. लहानपणापासूनचं ते हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते. सर्वात पहिला मोर्चा त्यांनी वयाच्या १२व्या वर्षी काढला. लहान वयात त्यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले आणि आपल्यातील देशभक्तीचे दर्शन त्यांनी सर्वांना करून दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना लाला लजपत राय, बाळ गंगाधर टिळक आणि विपिन चंद्र पाल यांसारख्या क्रांतिकारक नेत्यांकडून प्रेरणा मिळाली. त्यांनी क्रांतिकारी कार्यात भाग घेण्यासाठी स्वतःची संघटना स्थापन केली. पदवी मिळवताना त्यांनी क्रांतिकारी कार्य चालू ठेवले. शिष्यवृत्तीमुळे त्यांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्याचीही संधी मिळाली. त्यांनी कृष्ण वर्मा यांना सामाजिक बाबतीत मदत केली आणि त्यांचे कायदेशीर शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांना इंग्लंडला पाठवले. इंग्लंडमध्ये कठोर शिक्षण घेत असताना त्यांनी तेथील सर्व भारतीय विद्यार्थ्यांना फ्री इंडिया सोसायटी तयार करण्यासाठी प्रवृत्त केले.
त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्यादरम्यानचं त्यांना ५० वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. ४ जुलै १९११ रोजी त्यांना त्यांना अंदमान आणि निकोबार बेटांमधील सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं. त्या काळात त्यांच्यावर अत्याचार झाले. हिंदुत्वाचा प्रसार संपूर्ण राष्ट्रात करण्यासाठी सावरकरांनी तुरुंगात असताना हिंदुत्व: हिंदू कोण आहे या शीर्षकाची वैचारिक पत्रके तयार करुन वितरीत केली. जी कालांतराने संपूर्ण देशात पसरली. सावरकरांच्या समर्थकांकडून त्यांना भरपूर पाठिंबा मिळाला.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या लढ्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी
१९११ मध्ये, सावरकरांना मोर्ले- मिंटो सुधारणांविरुद्ध (इंडियन कौन्सिल ऍक्ट १९०९) बंड केल्याबद्दल अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये ५० वर्षांची शिक्षा झाली. ज्याला काळ्या पाण्याची शिक्षा असंही म्हणतात.
हिंदू महासभेच्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष म्हणून काम करताना, त्यांनी १९४२ मध्ये भारत छोडो आंदोलनाला विरोध केला. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आणि भारताच्या फाळणीच्या मान्यतेचे टीकाकार होते.
तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी रत्नागिरीत अस्पृश्यता निर्मूलनाचे काम केले.
‘द हिस्ट्री ऑफ द वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स’ या पुस्तकात त्यांनी १८५७ च्या उठावाच्या परिस्थितीचे विश्लेषण केले आहे. या पुस्तकाद्वारेच सावरकर हे ब्रिटिशांविरुद्ध भारताच्या पहिल्या स्वातंत्र्ययुद्धाची हाक देणारे पहिले लेखक ठरले.
१९४८ मध्ये त्यांच्यावर महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणारा म्हणून आरोप ठेवण्यात आला होता, मात्र, न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटका केली.
सावरकर हे स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी, कार्यकर्ते, वकील, लेखक, समाजसुधारक आणि हिंदुत्व तत्त्वज्ञानाचे सूत्रधार होते.
हे ही वाचा:
ठाकरे, शरद पवारांची स्क्रीप्ट जरांगे बोलत आहेत!
रांचीत टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर
२२ वर्षांपासून फरार असलेला दहशतवादी भुसावळ मध्ये सापडला!
२९ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित; दिल्लीच्या सीमा अंशतः खुल्या