शौर्याला सलाम: जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली

शौर्याला सलाम: जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांना श्रद्धांजली

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात बुधवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनचक आणि पोलिस उपअधीक्षक हिमायुन मुझमिल भट यांना प्राण गमवावे लागले. या घटनेनंतर देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.

‘ज्यांनी राजौरीमध्ये कर्तव्य पाडताना प्राण अर्पण केले, त्या सैन्याच्या शूरवीरांच्या धैर्याला आणि सर्वोच्च बलिदानाला मी सलाम करतो. त्यांच्या निस्वार्थ सेवेला देश नेहमी स्मरणात ठेवेल. शहीदांच्या कुटुंबीयांप्रति माझ्या मनःपूर्वक संवेदना,’ असे जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी ‘एक्स’वर लिहिले आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या कारवाईत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना या दु:खातून सावरण्यासाठी धीर मिळो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. “#अनंतनाग, जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवाईत दोन लष्करी अधिकारी आणि एका पोलिस अधिकाऱ्याने आपला जीव गमावला आहे. आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःचे बलिदान दिले आहे. या शहिदांनी अत्यंत समर्पण वृत्तीने आणि शौर्याने भारताची सेवा केली आहे. माझी ईश्वराकडे प्रार्थना आहे, त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना ही हानी सहन करण्याची शक्ती द्या,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही शूरवीरांच्या कुटुंबियांप्रति तीव्र शोक व्यक्त केला. ‘आमच्या शूर लष्कराच्या जवानांनी आणि एका डीएसपीने जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले आहे. त्यांच्या हानीमुळे आम्ही अत्यंत दु:खी आहोत. आमच्या शूरवीरांच्या कुटुंबियांप्रती आमची तीव्र संवेदना आहे. भारत दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा आहे,’ अशी पोस्ट त्यांनी ‘एक्स’वर दिली आहे.

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी चकमकीत शहीद झालेल्यांच्या कुटुंबीयांना धीर दिला आहे. ‘जम्मू आणि काश्मीरमधून भयानक बातमी. आज दक्षिण काश्मीरमधील कोकरनाग भागात झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, एक मेजर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिस डीवायएसपी यांनी अंतिम बलिदान दिले. डीवायएसपी हुमायन भट, मेजर आशिष धोनक आणि कर्नल मनप्रीत सिंग यांनी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आपले प्राण दिले. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो आणि या कठीण काळात त्यांच्या प्रियजनांना बळ मिळो, ’ असे ट्वीट ओमर अब्दुल्ला यांनी केले.

काँग्रेसचे माजी नेते आणि काश्मीरचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनीही शहिदांच्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी प्रार्थना केली. ‘कोकरनाग येथे कर्तव्य बजावताना, आम्ही आज लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनक आणि डीवायएसपी हुमायुन भट यांना चकमकीत गमावले आहे. ही भयंकर बातमी स्वीकारणे खूप कठीण आहे. हे नुकसान सहन करण्यासाठी धैर्य आणि सामर्थ्य एकवटणे कठीण आहे. ज्यांनी आमच्या चांगल्या उद्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी बलिदान दिले, त्या शहिदांच्या आत्म्याला शांती लांभावी, यासाठी मी प्रार्थना करतो!’, असे त्यांनी ट्विट केले. जम्मू-काश्मीरचे डीजीपी दिलबाग सिंग यांनीही डीएसपी हिमायुन मुझमिल यांना पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

हे ही वाचा:

मराठा समाजाला एकनाथ शिंदे न्याय देऊ शकतात!

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ देशभरातील पाच शहरांत प्रदर्शित करणार

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस घेतले, जरांगेंचे उपोषण मागे

केरळमध्ये ‘निपाह’चा पाचवा रुग्ण; मिनी लॉकडाऊन लागू

पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाचा एक गट मानल्या जाणाऱ्या प्रतिबंधित गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अधिकाऱ्यांना संशय आहे की, याच दहशतवाद्यांनी ४ ऑगस्ट रोजी लष्कराच्या जवानांवर हल्ला केला होता.

Exit mobile version