शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी

कुलाब्यामध्ये पालिका आयुक्तांचा नागरिकांकडे दुर्लक्ष

शौचालयाच्या स्वच्छतेसाठी वापरावे लागते खारे पाणी

मुंबईतील दक्षिण भागातील कुलाबा परिसरातील सुंदर नगरी येथील सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेसाठी चक्क पंपामार्फत समुद्राचे पाणी वापरण्यात येते. समुद्राचे पाणी वापरल्यामुळे शौचालयाची दुरावस्था झाली आहे. शौचालयातील दुर्गंधीयुक्त पाणी व मैला वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याची तक्रार वारंवार स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच या तक्रारीचे प्रशासन दखल घेत नसल्याचे आरोप येथील रहिवाशांनी केले आहे.

तसेच कुलाबा येथील समुद्रालगत २ सार्वजनिक शौचालय आहेत. त्यापैकी एक शौचालय हे तौक्ते वादळामुळे नुकसान झाल्यामुळे काही वर्षापासून बंद अवस्थेत आहे. तर दुसऱ्या शौचालयाची दुरावस्था झाली आहे. तसेच या शौचालयाची देखभाल योग्य पद्धतीने होत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या प्ररकणी माज़ी नगरसेवक दिलीप नाईक यांनी पालिकेच्या ए विभाग कार्यालयाला पत्र पाठवलेत होते. तसेच शौचालय वापरकर्त्याकडून पैसे घेण्यासाठी माणूस पाठवला जातो. तो दिवसाला हजारो रुपये कमावतो मात्र देखभालीकडे लक्ष देत नाही. तसेच शौचालयासाठी स्वतंत्र जलजोडणी असून सुद्धा ते पाणी अन्य दुसऱ्या कारणासाठी वापरतात. असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा : 

आपले तुकडे करण्यात येतील, असे पत्र दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलिसांना दिले होते!

लोकांची सेवा करतोय तोपर्यंत सरकार टिकेल

दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला? सीबीआय तपासात झाले उघड

‘ज्यांनी बाळासाहेबांना विरोध केला, त्यांना आदित्य भेटणार’

दरम्यान, कुलाबा सुंदर नगरी येथील सार्वजनिक शौचालय हे मुंबई महानगर पालिकेनं बांधले नसून, म्हाडा अंतर्गत बांधण्यात आले आहे. त्यामुळे या शौचालयाची डागडुजी करण्याचे काम हे महानगर पालिकेचे नसून म्हाडा तर्फे केले जाते. मात्र तात्पुरता स्वरूपाची कामे ही महानगर पहिला करू शकते. अशी माहिती ए विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव यांनी दिली.

Exit mobile version