बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुंबईतील वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर धमकी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सलमान खानला अशा धमक्या मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही सलमान खानला अनेक वेळा धमक्या देण्यात आल्या आहेत. सध्या पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे आणि अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हाही दाखल केला.
या प्रकरणी वरळी पोलिसांनी वडोदरा येथून मयांक पंड्या याला अटक केली आहे. तो मनोरुग्ण असल्याचे कळते.
अभिनेता सलमान खानला त्याच्या घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीत सलमान खानची गाडी बॉम्बने उडवण्याचे म्हटले आहे. वाहतूक विभागाच्या नंबरवर पाठवलेल्या मेसेजमध्ये सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची आणि त्याच्या घरात घुसून त्याला ठार मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणी कारवाई करत आहेत आणि अज्ञात व्यक्तीबद्दल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या धमकी प्रकरणी अद्याप सलमान खान किंवा त्याच्या कुटुंबियांची कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
हे ही वाचा :
… तर मुस्लिम तरुणांना पंक्चर दुरुस्तीचे काम करावे लागले नसते
गुजरातजवळील अरबी समुद्रातून १,८०० कोटींचे ३०० किलो ड्रग्ज जप्त
पवन कल्याण यांच्या पत्नीने तिरुमला मंदिरात केले केस दान; काय आहे कारण?
म्यानमार: ‘ऑपरेशन ब्रह्मा’मध्ये सहभागी असलेल्या हवाई दलाच्या विमानावर जीपीएस स्पूफिंग हल्ला
दरम्यान, गेल्या काही वर्षांत बॉलिवूड अभिनेत्याला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमक्या येत आहेत. गेल्या वर्षी सलमानच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता. यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली. याच दरम्यान, नेता बाबा सिद्दीकीचीही हत्या करण्यात आली, ज्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली. बाबा सिद्दीकी हे सलमान खानच्या जवळचे असल्याचे म्हटले जात होते. या प्रकरणी पोलिसांकडून काही जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.