25 C
Mumbai
Monday, January 6, 2025
घरविशेषमीराबाईचे अभिनंदन करून सलमान खान ट्रोल

मीराबाईचे अभिनंदन करून सलमान खान ट्रोल

Google News Follow

Related

हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार सलमान खान हा मीडिया, सोशल मीडियामध्ये चांगलाच चर्चेत असतो. तर अनेकदा तो ट्रोल होतानाही दिसतो. कधी त्याच्या चित्रपटांमुळे किंवा कधी त्याच्या एखाद्या सोशल पोस्टमुळे. सध्या पुन्हा एकदा सलमान खानचे सोशल मीडियावर ट्रोलींग होताना दिसत आहे आणि ते देखील ऑलिम्पिक पदक विजेत्या मीराबाई चानू हिला भेटल्यामुळे!

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत या देशाची मान अभिमानाने उंचावली. त्यांच्या या कामगिरीसाठी देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यामध्ये महिलांच्या वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारी मीराबाई चानू हिने दमदार कामगिरी करत रौप्य पदक पटकावले. तिच्या या कामगिरीमुळे भारताचे ऑलिम्पिकमध्ये पदक क्रमवारीत खाते उघडले.

हे ही वाचा:

शिक्षणसम्राट मंत्र्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी टेकले गुडघे

सरकार आहे की सर्कस?

राज्यसभेत काँग्रेस खासदारांचे प्रगल्भ, लोकशाहीवादी वर्तन

 

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

ऑलिम्पिकमध्ये यश मिळवून मीराबाई भारतात परतल्यानंतर अनेक जण मीराबाईला भेटून तिचे अभिनंदन केले. अशातच बुधवार, ११ ऑगस्ट रोजी बॉलीवूड अभिनेता सलमान खान हा मीराबाई चानू हिची भेट घेण्यासाठी गेला. यावेळी मीराबाई चानू हिने सलमान खानचे स्वागत केले. यावेळी मीराबाईने सलमानला अस्सल पारंपारिक अशी मणिपुरी स्कार्फ देऊ केला.

या स्कार्फवर काळवीटाचे चित्र होते. यावरूनच नेटकाऱ्यांनी सलमानला ट्रोल केले आहे. याला सलमान खानचा पूर्वाश्रमीच्या आयुष्याची पार्श्वभूमी आहे. सलमान खानच्या विरोधात काळवीट शिकार प्रकरणातील एकी खटला चालू आहे. सलमान या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी सलमान खानला ट्रोल केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा