रायगड जिल्ह्यात दोन आठवड्यांपूर्वी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली होती. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटनाही समोर आल्या. यावेळी पोलादपूर तालुक्यातील केवनाळे गावात १४ वर्षांच्या साक्षी दाभेकर हिने धीटाईने दोन महिन्यांच्या मुलाचे प्राण वाचवले. मात्र भिंत अंगावर कोसळल्यामुळे साक्षी जबर जखमी झाली. त्यातच तिचा पाय कापावा लागला. पण अखेर कृत्रिम पायाच्या जोरावर साक्षी पुन्हा उभी राहणार आहे.
पोलादपूरमध्ये दरड कोसळत असताना दोन महिन्यांच्या बाळाला वाचवण्याच्या प्रयत्नात १४ वर्षांच्या साक्षी दाभेकरला लवकरच कृत्रिम पाय मिळणार आहे. रायगडची रहिवासी असलेल्या साक्षीचा पाय शस्त्रक्रियेनंतर गुडघ्यापासून खाली कापण्याची वेळ आली होती. त्यामुळे कुटुंबासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं होतं. मात्र साक्षीच्या पुढील उपचाराची संपूर्ण जबाबदारी महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलद्वारे स्वीकारली आहे. साक्षीला फॅंटम लिम्ब लावण्यात येणार आहे. फॅंटम लिम्ब म्हणजे हालचाल करण्यासाठी पाय लावला जाणार आहे. याकरता तब्बल सहा महिने जावे लागतील. जखम बरी होण्यासाठी कमीत कमी सहा महिने लागतील. त्यानंतर आधी जयपूर फूट आणि नंतर १२ लाखांचा खर्च करून सारबो रबर पाय तिला बसवण्यात येणार आहेत.
हे ही वाचा:
मुंबईतील या घरांचे काम पुरते रखडले!
अमित शहा-शरद पवार भेटीचे दरेकरांनी काय कारण सांगितले?
…तर असे दिवसाला १०० गुन्हे दाखल करा, पण मी बोलत रहाणार
ईव्हीएम विरोधकांना न्यायालयाने काय चपराक लगावली?
१४ वर्षांची साक्षी दाभेकर धावपटू आहे. कबड्डी आणि खो खो हे क्रीडा प्रकार ती तालुका स्तरावर खेळते. पण आता तिला पाय गमवावा लागला होता. घटना घडल्यानंतर साक्षीला तातडीने रायगडहून मुंबईत हलवण्यात आले. ‘केईएम’ रुग्णालयामध्ये तिच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी दुर्दैवाने तिचा पाय गुडघ्यापासून खाली कापावा लागला. तालुका स्तरावरील धावपटू विद्यार्थिनीचा पाय कापावा लागल्याने तिच्या भवितव्याविषयी कुटुंबीयांच्या मनात चितेंचं वातावरण होतं.