31 C
Mumbai
Wednesday, October 16, 2024
घरविशेषशिवाजी मंदिर ट्रस्टवरून महाराव यांची हकालपट्टी करा!

शिवाजी मंदिर ट्रस्टवरून महाराव यांची हकालपट्टी करा!

सकल हिंदू समाजाने केली मागणी

Google News Follow

Related

ज्ञानेश महाराव यांनी प्रभू श्रीरामाचा केलेला अवमान आणि श्री स्वामी समर्थांची उडविलेली थट्टा यामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना आता सकल हिंदू समाजाने महाराव यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. सकल हिंदू समाजाने ज्ञानेश महाराव यांची श्री छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर संस्थेच्या विश्वस्त पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केलेली आहे.

सकल हिंदू समाजाने म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टला अशी विनंती आहे की, त्यांनी महाराव यांना विश्वस्त पदावरून हटवावे. छत्रपती शिवाजी मंदिर हे मुंबईचे श्रद्धास्थान आहे. जर या स्मारक मंडळाच्या विश्वस्त मंडळातील सदस्य असलेल्या महाराव यांच्याकडून देवीदेवतांचा अवमान होणार असेल तर अशा व्यक्तीला विश्वस्त म्हणून त्यांची हकालपट्टी करावी. शिवाजी मंदिर स्मारकाने आपली ठोस भूमिका घ्यावी. येणाऱ्या काळात या शिवाजी मंदिराची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, त्यांनी हा निर्णय घेतला तर आम्ही त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानू.

हे ही वाचा:

शांततेचा नोबेल पुरस्कार अण्वस्त्रमुक्त जगासाठी काम करणाऱ्या जपानच्या संस्थेला

दिल्ली पोलिसांची पुन्हा मोठी कारवाई, २००० कोटींचे कोकेन जप्त!

बलुचिस्तानमध्ये कोळसा खाणकाम मजुरांवर गोळीबार; २० जण ठार

मसुरीतील चहा थुंकी प्रकरण: मोहम्मद नौशाद आणि मोहम्मद हसनला बेड्या!

ज्ञानेश महाराव यांनी संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात प्रभू श्रीराम, सीतामाई, बंधू लक्ष्मण यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती तसेच अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांबद्दलही त्यांनी अपमानजनक शब्दप्रयोग केला. त्यामुळे महाराष्ट्रात एक संतापाची लाट उसळली होती. मुख्य म्हणजे या कार्यक्रमासाठी स्वतः राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार उपस्थित होते तसेच कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपतीही मंचावर होते. पण त्यांच्यासमोरच अशा पद्धतीने देवीदेवतांचा अपमान होत असताना त्यांनी कोणतीही भूमिका घेतली नाही, अशी प्रतिक्रिया जनमानसात उमटली होती.

यानंतर भाजपाचे दक्षिण मध्य मधील पदाधिकारी राजेश शिरवडकर यांनी महाराव यांना जाब विचारला. तेव्हा आपण जे बोललो त्याबद्दल माफी मागतो, असे महाराव यांनी शिरवडकर यांना सांगितले.

आता सकल हिंदू समाजाकडून ही मागणी करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
182,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा