ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना बुधवार, १ सप्टेंबर रोजी सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत होते. पण सायरा बानू यांच्या जीवाला कोणताही धोका नसल्याचे आता सांगण्यात येत आहे.
सायरा बानू यांना रुग्णालयात दिल्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. पण त्यानंतर डॉक्टरांनी अशी माहिती दिली की सायरा बानू यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या जिवास कोणताही धोका नाही. लवकरच त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात येईल.
हे ही वाचा:
अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात
सीएनएनला भारत सरकारची कृतीतून चपराक
मंदिरे खुली करू नका, असे केंद्राने कुठे सांगितले?
भाजपाचा गुरुवारी मुंबई महानगरपालिकेवर ‘विश्वासघात’ मोर्चा
पण असे असले तरीही सायरा बानू यांच्यावर अँजिओग्राफी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांना आता रुग्णालयातून तात्पुरते सोडले जाईल. पण नंतर पुन्हा त्यांना दाखल करून सर्व आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाईल अशी माहिती मिळत आहे.
सध्द्या सायरा बानू यांचे वय ७७ आहे. तर काही महिन्यांपूर्वीच त्यांचे पती आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले आहे.