पॅरिस ऑलिम्पिकममध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात १०० ग्रॅम वजन वाढल्याने भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरवण्यात आले. यामुळे देशातील सर्व नागरिकांना धक्का बसला असून सर्वजण दुःखी झाले आहेत. पंतप्रधान मोदीही ऑलिम्पिक असोसिएशनला आवाहन करून या प्रकरणात काहीतरी चांगले होण्याची शक्यता व्यक्त करत आहेत. प्रत्येकजण विनेशला पाठिंबा देत आहे, तर एक विशिष्ट वर्ग यासाठी भारतीय कुस्तीपटूला दोष देत आहे. बॅडमिंटन स्टार सायना नेहवालने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगटच्या अपात्रतेसाठी तिला जबाबदार धरले आहे. तिने सोशल मीडियावर म्हटले की, ती एक अनुभवी कुस्तीपटू आहे. स्पर्धेदरम्यान तिने स्वतःच्या वजनाची काळजी घ्यायला हवी होती. तिने आपली चूक मान्य करायला हवी.
२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणारी सायना नेहवाल म्हणाली की, विनेशच्या अपात्रतेमुळे तिला दु:ख झाले आहे पण यासाठी इतर कोणाला दोष देणे योग्य नाही. जर तुम्हाला खेळाचे सर्व नियम माहित असतील तर ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत तुम्ही अशी चूक कशी काय करू शकता. चूक विनेशच्या बाजूनेही आहे. तिने आपल्या वजनाची काळजी घ्यायला हवी होती.
हे ही वाचा:
बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील नागरिकांच्या सुटकेसाठी मुख्यमंत्र्यांची एस जयशंकर यांच्याशी चर्चा
मैत्रिणीला आयफोन खरेदीकरण्यासाठी ९ वीच्या विद्यार्थ्याचा आईच्या दागिन्यांवर डल्ला !
विनेशच्या बाहेर पडण्यावर नड्डा म्हणाले, ‘संपूर्ण देश तिच्यासोबत आहे, पण हे दुर्दैव…’
जपानला ७.१ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का; त्सुनामीचाही इशारा
विनेश ही दोन ऑलिम्पिक खेळलेली अनुभवी खेळाडू
सायनाने म्हटले की, विनेश ही नवीन खेळाडू नाही. ती तिची पहिली ऑलिम्पिक खेळत नाहीये. याआधीही ती दोनदा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळली आहे. तिचे हे तिसरे ऑलिम्पिक आहे. चूक कशी झाली माहीत नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं. सायना पुढे म्हणाले की, वजन जास्त असल्यामुळे इतर कोणत्याही कुस्तीपटूला बाद ठरवण्यात आल्याचे आजपर्यंत ऐकण्यात आलेले नाही.
विनेशने अपात्रतेची जबाबदारी घ्यायला हवी
सायनाने सांगितले की, मला विनेशबद्दल सहानुभूती आहे, पण जे काही झाले ते चुकीचे झाले. ती अनुभवी खेळाडू आहे. खेळाचे सर्व नियम माहिती आहेत. त्यामुळे अपात्रतेची जबाबदारी तिने घेतली पाहिजे. अंतिम फेरीत अशी चूक व्हायला नको पाहिजे होती. मी तिला नेहमीच खूप मेहनत करताना पाहिले आहे. ती स्वतःचे १०० टक्के देते पण ही चूक महागात पडली, असे सायनाने म्हटले.