नौदलाचा पश्चिम कमांड आणि माझगाव डॉक लिमिटेड यांनी संयुक्तपणे नौकानयन स्पर्धा आयोजित केली होती. देशभरातील आंतरराष्ट्रीय स्तराच्या ११७ दर्यावर्दीनी यात सहभाग घेतला होता. अलीकडेच या स्पर्धेचा समारोप झाला. चीनमध्ये पुढीलवर्षी होणाऱ्या नौकानयन आशिया चषकाच्या निवडीसाठी मुंबई येथे ही स्पर्धा झाली. अरबी समुद्रात या दर्यावर्दीनी आपली कामगिरी दाखवली.
कुलाब्यातील ‘नेव्हल वॉटरमनशिप प्रशिक्षण केंद्र’ या नौकानयन क्लब अंतर्गत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. कुलाब्याच्या पूर्वेकडील गेट वे ऑफ समोरील संक रॉक दीपस्तंभ व दक्षिणेकडील प्रांग्स दीपस्तंभ (कुलाब्याची दांडी) दरम्यान ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत एकूण ११७ दर्यावर्दी सहभागी झाले होते.
हे ही वाचा:
भारत विरुद्ध इंग्लंड एक दिवसीय आणि टी-२० मालिकेचे वेळापत्रक जाहीर
‘इंडियन आयडल फेम’ सायली का आहे आशाताईंची भक्त
सचिन वाझेला पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आता जनतेला उत्तर द्यावे
सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार
या स्पर्धेमध्ये एकूण नऊ श्रेणींमध्ये ७५ शर्यती घेण्यात आल्या. देशभरातून १३ क्लब या स्पर्धेत सहभागी झाले होते. सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे समुद्रात वाऱ्याचा वेग अधिक आहे. त्यामुळे ताशी ८ ते १५ सागरी मैल या वेगाने वारे वाहत होते. तरीही या सर्व दर्यावर्दीनी स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत २८ महिला स्पर्धकांनीही सहभाग घेतला होता. सर्वात लहान स्पर्धक ही १४ वर्षांची मुलगी होती.
भूदल नौकानयन क्लब, ईएमई नौकानयन असोसिएशन, तामिळनाडू नौकानयन असोसिएशन, भूदल इंजिनिअरींग नौकानयन क्लब आणि हैदराबाद नौकानयन क्लबच्या स्पर्धकांनी या स्पर्धेत पदक मिळवले.