संजय राऊत बोलतात त्याच्या नेमके उलटे घडते!

सामन्यातील रोखठोकमधील दाव्यावर भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

संजय राऊत बोलतात त्याच्या नेमके उलटे घडते!

शिवसेना उबाठा गटाचे खासदार संजय राऊत जे बोलतात त्याविरुद्ध सर्व घडत असते, असे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटले आहे. तसेच ५ वर्ष मोदीच पंतप्रधान राहतील हा साईचरणी दावा असल्याचेही गोगावले यांनी म्हटले आहे.

सामनाच्या आजच्या रोखठोखमधून संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आणि  २०२५ मावळताना मोदी पदावर नसतील असे म्हटले. देशात मोठे स्थित्यंतर होईल. मोदी-शहांच्या कुंडलीतला राजयोग संपले असे चित्र स्पष्ट दिसते, असे म्हटले आहे. यावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

भरत गोगावले म्हणाले, गेले अडीच वर्ष संजय राऊत जे बोलत आहेत, त्याविरोधात सर्व होत आहे. शिंदे सरकार स्थापन झाले तेव्हा दोन, तीन महिन्यात सरकार पडेल असे राऊत म्हणाले होते. मात्र, सरकार न पडता आणखी मजबूत होत गेले. सुरवातीला आम्ही दोघे होतो आता तिघेजण आहोत. ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी हे वर्ष पंतप्रधान पदावर राहतील हा माझा साईचरणी दावा आहे.

हे ही वाचा : 

माझ्या वडिलांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी श्रद्धांजली सभा घेतली नाही

दिल्लीत सापडले ८ बांगलादेशी नागरिक, बांगलादेशला रवानगी!

भिंतीला हिरवा रंग, फुले-चादर चढवली, भाजपा खासदार मेधा कुलकर्णींनी हिरव्या रंगावर दिला भगवा रंग!

लडाखमध्ये पँगाँग किनाऱ्याला १४ हजार फुटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा!

 

Exit mobile version