साईभक्तानो शिर्डीत साईबाबाला हार, फुले अर्पण करा!

साई संस्थान भाविकांना स्वस्त दरात फुलांची विक्री करणार

साईभक्तानो शिर्डीत साईबाबाला हार, फुले अर्पण करा!

साईभक्तांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता साई मंदिरात जाताना साईबाबाला आता हार, फुले आणि प्रसाद नेता येणार आहे. साई संस्थान समितीने यासाठी परवानगी देण्याचे ठरविले आहे. साई संस्थानने भाविकांचा आनंद द्विगुणीत केलेला आहे. आता साई संस्थान भाविकांना स्वस्त दरात फुलांची विक्री करणार आहे. थेट शेतकऱ्यांकडून फुले खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात ग्राहकांसाठी उपलब्ध केली जाणार आहेत. यामुळे दुकानदाराकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन होणारी लूट थांबण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनादेखील यामुळे दिलासा मिळणार आहे.

कोरोना काळापासून साई संस्थानने साईबाबांना फुले, हार, प्रसाद अर्पण करण्यास बंदी घातली होती. मात्र ती बंदी आता उठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. गेले अनेक दिवस शिर्डीच्या साई मंदिरात फुले व नैवेद्य नेण्यास बंदी घातल्यामुळे तणाव वाढून हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले होते. साईभक्तांमध्येही नाराजी होती. साईभक्त आणि स्थानिक दुकानदार ही बंदी उठवण्यासाठी वारंवार मागणी करताना दिसत होते. काही दिवसांपूर्वी शिर्डीतील ग्रामस्थ आणि दुकानदारांनी हार व फुले मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि आंदोलकांमध्ये हाणामारीपर्यंत हे प्रकरण गेले होते.

हेही वाचा :

चिनी सैनिकांच्या कृत्यांना भारतीय जवान देणार त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर

भगवान परशुराम ब्राह्मतेज, क्षात्रतेजाचे प्रतीक

जम्मू-काश्मीरचे सांगिओटे गाव ईद साजरी करणार नाही!

आव्हाडांचा हिंदूद्वेष पुन्हा उफाळला; भाजपाकडून संताप

साई मंदिरातील हार, फुले आणि प्रसाद या बंदीमुळे दुकानदारांसह शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. शिर्डीत अंदाजे ५०० च्या आसपास शेतकरी फुलांची लागवड करतात. शिर्डीत दररोज लाखो रुपयांचा फुलांचा व्यवसाय होतो. बंदीमुळे शेतात फुले वाया जात होती. साहजिकच शेतकरी हवालदिल झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत होता.

Exit mobile version