नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमिचा पुरस्कार

नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमिचा पुरस्कार

साहित्य क्षेत्रातील मानाच्या पुरस्कारांपैकी एक असलेल्या साहित्य अकादमीच्या पुरस्कारांची घोषणा झाली. यात मराठीसाठी नंदा खरे यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारला आहे.

साहित्या अकादमीने यावर्षीसाठी २० भाषांसाठी पुरस्कार जाहीर केला. यात सात कविता संग्रह, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटके आणि प्रत्येकी एका संस्मरण आणि महाकाव्याचा समावेश आहे. मराठी साहित्यातील निवड समितीमध्ये सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके, डॉ. निशिकांत मिराजकर यांचा समावेश होता. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून एका विशेष कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

जगाला अलविदा म्हणायची वेळ जवळ येत आहे – सचिन वाझे

मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामिन मंजूर

औरंगजेबाची सत्तेकडे वाटचाल (भाग ४)

शिवसेनेच्या मंत्र्याने शेतकऱ्यांचे थकवले कोट्यवधी रुपये

या बरोबरच आबा महाजन यांच्या ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहाची बालसाहित्य पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

नंदा खरे यांनी मात्र हा पुरस्कार नाकारला आहे. समाजाने आपल्याला भरपूर दिलं, असं नंदा खरे म्हणाले आहेत.

 

Exit mobile version