इंडियन आयडॉल मराठी या सिंगिंग रियालिटी शो चे पहिले पर्व नुकतेच पार पडले आहे. बुधवार, २० एप्रिल रोजी या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा संपला असून पनवेलचा सागर म्हात्रे युवा गायक हा पहिला मराठी इंडियन आयडॉल ठरला आहेत.
सागर म्हात्रेला त्याच्या विजय कामगिरीसाठी पाच लाख रुपये रोख रक्कम तसेच एक ज्वेलरी गिफ्ट व्हाऊचर आणि मानाचा चषक मिळाला आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मतांच्या जोरावर सागरने हा विजय पटकावला आहे. अंतिम सोहळ्यात दाखल झालेल्या पाच स्पर्धकांपैकी सर्वात जास्त मते सागरला मिळाली.
हे ही वाचा:
अबब! मविआच्या मंत्र्यांनी स्वतःवरील उपचारासाठी किती खर्च केला बघा?
सर्वोच्च न्यायालयात सगळेच वकील म्हणाले, जहांगीरपुरीमध्ये अतिक्रमणे!
सदावर्ते पाच दिवस कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात
खंडणी मागणारी धनंजय मुंडे यांची मेहुणी
सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल हे या इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाचे परीक्षक म्हणून काम बघत होते. स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत सागर म्हात्रे नंतर जगदीश चव्हाण हा उपविजेता ठरला आहे. तर श्वेता दांडेकर ही तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरली आहे. त्या दोघांनाही अनुक्रमे तीन लाख आणि दोन लाखाचे बक्षीस देण्यात आले आहे.