शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?

शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्तेंचा सवाल

गेले दोन महिने सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासाठी न्यायालयीन बाजू लढवणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर शरसंधान केले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे का गेले नाहीत? ते राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे का गेले? शरद पवार हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का? अशा शब्दांत सदावर्ते यांनी परब यांना जाब विचारला आहे.

सोमवारी शरद पवार, अनिल परब यांच्यासह एसटी कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली आणि त्यात संप मागे घेण्याचे आवाहन कर्मचाऱ्यांना करण्यात आले तसेच सदावर्ते यांना वकीलपदावरून हटवून तिथे सतीश पेंडसे यांची नियुक्ती केल्याचेही जाहीर करण्यात आले. त्यानंतर सदावर्ते यांनी एसटी कर्मचारी, अनिल परब यांच्यावर तोंडसुख घेतले.

सदावर्ते म्हणाले की, ज्या संघटनांकडे कर्मचारीच नाहीत त्यांना बैठकीसाठी का बोलावण्यात आले. संघटनांचे पदाधिकारी हे शरद पवारांवर स्तुतीसुमने उधळत होते. जणू काही शरद पवारांचा आज वाढदिवसच होता. स्तुती करतानाच ते कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगत होते आणि गिरणी कामगार होऊ देऊ नका, असेही आवाहन करत होते. त्यामुळे ही बैठक नव्हे तर शोकसभा होती आणि हे पदाधिकारी कैद्यांसारखे वागत होते, असे चित्र दिसत होते.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

कशी विश्वनाथ धाम येथील कर्मचाऱ्यांना पंतप्रधान मोदींनी दिली ‘ही’ खास भेट

सदावर्तेंना हटवून पेंडसेंची नियुक्ती; संप मागे घेण्याचे शरद पवारांचे आवाहन

राष्ट्रवादीच्या मदतीने किल्ले लोहगडावर उरुसाचा डाव

 

या बैठकीबाबत सदावर्ते म्हणाले की, हुतात्मा झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांबद्दल शरद पवार एक शब्दही बोलले नाहीत. माझ्याकडे एसटीच्या ७५ हजार कर्मचाऱ्यांचे वकीलपत्र आहे. आम्ही विलिनीकरणासाठी शेवटपर्यंत लढत राहू. यापुढे एसटी कर्मचाऱ्याच्या प्रत्येक मृत्यूसाठी शरद पवार, अनिल परब, उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील.

Exit mobile version