ॲड गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी ॲड जयश्री पाटील यांना सहकार खात्याने दणका दिला आहे. सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बॅकेंतील(स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँके) संचालक पद रद्द करण्यात आले आहे.सदावर्ते दाम्पत्य यापुढे एसटी बँकेवर तज्ज्ञ संचालक म्हणून राहू शकणार नाहीत, असा सहकार खात्याकडून निर्णय देण्यात आला आहे.एसटी कामगार संघटनेचे राज्याचे नेते संदीप शिंदे यांनी सदावर्ते दाम्पत्याच्या विरोधात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीच्या आधारे सहकार विभागाने सदावर्ते दाम्पत्याचं एसटी बॅकेंतील संचालक पद रद्द केलं आहे.
एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये सहकार आयुक्तांकडे दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. सदावर्ते दाम्पत्याच्या हातात एसटी बँकेचा कारभार गेल्यापासूनच नाराजी व्यक्त केली जात होती.सदावर्ते चुकीचा कारभार करत आहेत, असा आरोप संदीप शिंदे यांनी केला होता.त्यानंतर सदावर्तेंनी नियम मोडल्याचं निरीक्षण नोंदवत सहकार विभागाने दोघांवर ही कारवाई केली आहे.त्यामुळे सदावर्ते दाम्पत्याच एसटी बॅकेंचे संचालक पद रद्द झाले आहे.
हे ही वाचा:
शरद पवार म्हणतात, उद्धव ठाकरे हे आमच्या विचारांचेच आहेत!
ऍस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून करोना लस मागे घेणार!
मायावतींचे भाचे आता त्यांचे राजकीय उत्तराधिकारी नाहीत!
हमास समर्थक, झाकीर नाईक समर्थक विचारांच्या मुख्याध्यापकांची हकालपट्टी!
एसटी कामगार संघटनेचे राज्याचे नेते संदीप शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, सहकार आयुक्तांनी निर्णय दिल्यानंतर सदावर्ते दाम्पत्य आता बँकेच्या संचालक पदावर राहणार नाहीत.जेव्हा पासून सदावर्ते यांची सत्ता एसटी बँकेवर आली, तेव्हापासून बँकेला खड्यात खळण्याचा जणूकाही निर्णयच त्यांनी घेतलेला होता.गेले आठ महिने झाले एसटी कर्मचाऱ्याला कर्ज मिळत नाहीये.विविध समस्या आहेत.
वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदावर्ते यांनी जे काही नियम आणले गेले होते, जे काही पोटनियम आणले होते त्याची माहिती सदस्यांना देण्यात आली नव्हती.याबाबत मी एसटी कामगार संघटनेतर्फे सहकार खात्याकडे केली होती.सहकार आयुक्तांनी या तक्रारीची दखल घेऊन सदावर्ते यांनी जे काही बेकादेशीर ठराव त्यांनी केले होते.ते रद्द ठरवण्यात आले आहे, असे संदीप शिंदे यांनी सांगितले.
ॲड गुणरत्न सदावर्ते यांनीही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले की, ज्या काही तरतुदी आहेत त्या कामगारांसाठी नाहीयेत.तुम्हाला हवे तर सहकार कायदा दाखवतो ते पाहिजे तर बघून घ्या.त्यामुळे या सर्व खोट्या गोष्टी आहेत.तक्रार करणारा संदीप शिंदे हा कष्टकरी नाहीये अशीच काहीतरी कामे दाखवायचं कामे करतो.जो सीडी रेशो ९८ वर गेला होता तो आज ९२ वर गेला आहे.कष्टकऱ्यांनी सीडी रेशो परत वर आणला आहे.आरोप करणारे जनसंघाचे नेते टक्केवारी खाणारे आहेत.शरद पवारांच्या कोणत्या संघटनेला पैसे पुरवण्यात आले, याची चौकशी बाहेर पडणार आहे, याची भीती आहे, त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.या सर्वाची चौकशी सुरु होणार आहे, त्यामुळे हे सर्व घडत आहे.मात्र आम्ही सुद्धा चांगलाच डोस देऊ.
ते पुढे म्हणाले, माझा कायद्यावर विश्वास आहे. हे सर्व अधिकार संचालक मंडळाला दिले गेले आहेत.सहकार आयुक्तांना देखील याचा अधिकार नाहीत.सवोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी देखील या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये चार न्यायालयांनी, आरबीआयने सुद्धा हस्तक्षेप करू नये अशी स्थगिती त्यांनी दिलेली आहे.हे सर्व अधिकार संचालक मंडळाला दिले आहेत.त्यामुळे सहकार आयुक्त तसे काही करू शकणार नाहीत, जर तसे काही करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे चौकशी करण्याची तक्रार करू.