‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक

देवेंद्र फडणवीसांनी विषय छेडल्यामुळे मानले आभार

‘सुरतेची लूट’ म्हणणाऱ्यांना इतिहास अभ्यासक सदानंद मोरेंची चपराक

शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली असा उल्लेख इतिहासात वारंवार केला जातो. त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते की, शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नव्हती. त्यावरून राजकारण पेटलेले असताना इतिहास अभ्यासक सदानंद मोरे यांनी शिवाजी महाराजांच्या सुरतेच्या स्वारीला लूट म्हणणाऱ्यांना चपराक लगावली आहे.

महेश म्हात्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीत सदानंद मोरे यांनी शिवाजी महाराजांना एका अर्थाने लुटारू ठरविणाऱ्यांना जाब विचारला आहे. ते म्हणतात की, सुरतेतला पैसा आला कुठून. कोणत्या मार्गाने आला. सरळ मार्गाने आला? ज्यांनी आणला तेच लुटारू होते. ज्यांना मान्य करायचे नाही त्यांना नमस्कार. ज्यांची मुळात ती वस्तू नव्हती. त्यांनी बळाचा वापर करून जमा केली. ज्यांची मालकीच नाही या भूमीवर त्यांनी ती प्रस्थापित केली आणि शेतकऱ्यांकडून अव्वाच्या सव्वा सारा वसूल केला. ती लूट नाही का मग त्या अर्थाने. हा मुद्दा आहे.

सदानंद मोरे म्हणतात की, मोगलानी वर्णन केले आणि त्यांची री इंग्रज इतिहासकारांना ओढली. वसाहतवादातून ज्यांचे शिक्षण झाले त्यांच्याही ते अंगवळणी पडले. देवेंद्र फडणवीसांनी सुरतेची लूट याला विरोध दर्शविला. ते निमित्त झाले. त्यातल्या राजकारणाशी माझा संबंध नाही. मी इतिहासाचा अभ्यासक आहे. फडणवीसांनी म्हटले किंवा अन्य कुणी केले असेल. पण इतिहासाची मांडणी करताना शिवाजी महाराजांनी जे आणले त्याला लूट म्हणायचे नाही पण त्यासाठी दुसरा शब्दही वापरायला हवा. ती जबाबदारी आहे आपली.

हे ही वाचा:

‘गैरहिंदू, रोहिंग्या मुस्लिमांना गावबंदी’

महावीर फोगाट म्हणतात, विनेशने भाजपात प्रवेश करायला हवा होता!

वारीची परंपरा गढूळ करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हायलाच हवा !

जरांगेना आता भुजबळांकडून येवल्याचे निमंत्रण

मोरे म्हणाले की, ही प्रक्रिया कशी सुरू झाली. आपण व्यापक विषयाकडे येतो ना. के. बेहेरे आपल्या मराठे, रजपूत शीख या लेखात म्हणतात, इंग्रजांनी मराठ्यांकडून राज्य जिंकून घेतल्यामुळे मराठ्यांना तुच्छ लेखण्याची त्यांची प्रवृत्ती बनली. मराठी म्हणजे चोर, भुरटे, लुटारू मग इतिहासात त्यांना कसे स्थान मिळणार? निःपक्षपाती म्हणवणाऱ्या इंग्रजी इतिहासकारांना लिहिणाऱ्या इंग्रजांना ही धुंदी चढली. मोगलांच्या स्तुतीपर अनेक ग्रंथ तयार झाले. रणजितसिंहावरती स्तुतीसुमने वाहिली तर हैदर अली त्याचा क्रूरकर्मा मुलगा टिपू यांनाही प्रशस्तीपत्रके मिळाली. परंतु मराठी शिवाजी महाराजांच्या कपाळी लागलेला लुटारूपणाचा टिळा मात्र गेला नाही. फडणवीस निमित्त ठरले. ते राजकारणी आहेत. त्यांच्या म्हणण्याचा राजकीय अर्थ लावण्याचा प्रयत्न विरोधक करणार. पण फडणवीसांचे आभार मानावे लागतील कारण त्यांनी हा विषय मांडून चर्चा सुरू केली.

मोरेंनी सांगितले की, माझ्या डोक्यात घोळणारा हा विषय आहे. ६००-७०० वर्षांच्या मराठ्यांच्या इतिहासातील अनुकूल कालखंड इंग्रज व हिंदी इतिहासकारांच्या दृष्टीने उपलब्ध नव्हता. मोगल रियासतीचा सविस्तर इतिहास लिहिताना केवळ नाइलाज म्हणून चोर व लुटारू ठरविलेल्या मराठ्यांचा अनुषंगिक उल्लेख इतिहासकार करत असतात. मोरेंनी सवाल उपस्थित केला की, माझ्या पुस्तकातील एक लेख म्हणजे लुटारूंची टोळी की राष्ट्रसाधकांची मांदियाळी? मराठे हे राष्ट्रसाधक होते. विन्सेन्ट स्मिथ शिवाजी महाराजांना लुटारू म्हणतो. खरे तर शिवाजी महाराज हे सुरतेला गेले आपलीच संपत्ती मिळविली पाहिजे म्हणून. ज्याचा मालकी हक्क आहे त्याची संपत्ती हिसकावून घेतली तर ती लूट. तसे आहे का शिवाजी महाराजांचे, मराठ्यांचे.

Exit mobile version