जेष्ठ संघ स्वयंसेवक यशवंत अर्जुन कोचरेकर यांचे निधन झाले आहे. ते सर्वांना भाऊ नावाने परिचित होते. समाजासाठी कार्य करण्यात सदैव तत्पर असणाऱ्या भाऊ यांच्या निधनाने त्यांच्या कुटूंबात शोककळा पसरली. भाऊ यांच्या निधनाने एक सच्चा समाजसेवक हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. दिनांक २४ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी भाऊंची प्राणज्योत मालवली.
यशवंत कोचरेकर उर्फ भाऊ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हाडाचे स्वयंसेवक होते. संघाच्या माध्यमातून समाजाचा उतराई होण्यासाठी भाऊ हे अखंड कार्यरत असायचे. संघकार्या सोबतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय जनता पक्ष अशा सर्व संघटनांमध्ये त्यांचा वावर होता. श्री हनुमान सेवा संघाचे भाऊ हे संस्थापक होते.
हे ही वाचा:
निर्लज्ज राहुल गांधी महिला- बुजुर्ग सन्मानाच्या बाता मारतायत
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा
सोनिया-सुप्रिया भेटीत काय घडलं?
समाजकार्य करताना भाऊंची बांधिलकीची जाणीव ही अत्युच्च असायची. त्यांनी कधी वेळ-काळ पहिलेच नाहीत. आपली भुमिका आणि मते ठामपणे मांडण्यासाठी भाऊ प्रसिद्ध होते. स्वभावाने निडर असणारे भाऊ ‘मी या भारत मातेचा सुपुत्र आहे, मला कुपुत्र व्हायचे नाहीये.’ असे भाऊ नेहमी म्हणत असत. अशा या सेवाव्रतीच्या निधनाने समाजाचे मोठे नुकसान झाले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.