राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देवगिरी प्रांताचे संघचालक मधुकरराव जाधव यांचे निधन झाले आहे. दाजी जाधव म्हणून ते प्रचलित होते. औरंगाबादचे रहिवासी असणाऱ्या दाजी जाधव यांनी शनिवार, १७ एप्रिल रोजी अखेरचा श्वास घेतला. समाजाच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या मधुकर जाधव यांच्या जाण्याने समाजाच्या प्रत्येक स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे.
मधुकरराव जाधाव हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान स्वयंसेवक होते. संघ संस्कारातून त्यांना समाजकार्याचे बाळकडू मिळाले होते. संघकार्य करताना त्यांनी शाखा स्तरापासून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. समाजासाठी ते सदैव तत्पर असायचे. आपल्या मधुर स्वभावातून माणसे जोडण्यात त्यांची हातोटी होती. ते दुरध्वनी खात्यात अभियंता म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. ‘अभंग मधु’ या नावाने त्यांचा विठ्ठल गीतांचा ग्रंथ त्यांनी लिहिला आहे.
हे ही वाचा:
ठाकरे सरकारची रेमडेसिवीरच्या किंमतीसाठी घासाघीस
मुख्यमंत्र्यांनी ‘माझे राज्य, माझी जबाबदारी’ म्हणत कर्तव्यपूर्ती करावी
गुजरातचे पत्र दाखवता, मग महाराष्ट्राचे का लपवता?
मधुकर जाधव यांना गेल्या काही काळापासून कर्करोगाने ग्रासले होते. एका योध्याप्रमाणेच ते या रोगाशी झुंजत होते. पण त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली.