अँटालिया स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकणातील मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला मुंबई सेंट्रल येथील वोकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती अस्वस्थ्यामुळे वाझे याला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर ओपन हार्ट पद्धतीची शस्त्रक्रिया होणार आहे. न्यायालयाकडून परवानगी मिळाल्या नंतर वाझे याला रुग्नालयात नेण्यात आले आहे.
या आधी सुरु होते जे.जे रुग्णालयात उपचार
सचिन वाझे हा तळोजा तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होता. पण सचिन वाझे याच्या छातीत दुखू लागल्यामुळे १५ ते २० दिवसापासून त्याच्यावर मुंबईतील जे.जे रुग्णालयात उपचार सुरू होते. सचिन वाझे याच्या रक्तवाहिनीत ३ मोठे ब्लॉक आढळून आले होते. त्यामुळेच त्याला शस्त्रक्रियेची गरज असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले होते. वाझेच्या वकिलांनी हा दावा न्यायालयात केल्यानंतर न्यायालयाने वाझेला रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली.
हे ही वाचा:
ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार ऑस्कर फर्नांडिस कालवश
मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज
हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
सुरुवातीला ही शस्त्रक्रिया भिवंडी येथील एका खासगी रुग्णालयात होणार होती. त्यासाठी वाझे यांना भिवंडी येथील रुग्णालयात दाखलाही करण्यात आले होते. पण नंतर वाझे याला आता मुंबई येथील रुग्णालयात हलवले गेले आहे.