सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात २७ मार्च रोजी झालेल्या सामन्यात अनेक विक्रम मोडले गेले. सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना डोंगराएवढी २७७ धावांची विक्रमी धावसंख्या उभारली होती. एवढ्या मोठ्या धावसंख्येसमोर अनेक संघ दबावाखाली येतात. पण मुंबई इंडियन्सने शस्त्रे टाकली नाहीत. आणि फलंदाजांनी शेवटपर्यंत झुंज दिली. अखेरच्या षटकापर्यंत मुंबई इंडियन्सने सामन्यातील रंगात कायम ठेवली. पण अखेर त्यांना ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला. अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, टिळक वर्मा, ईशान किशन यांच्यासह इतर फलंदाजांच्या स्फोटक खेळीने या सामन्यात थरार कायम होता. या सामन्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पला गुरुमंत्र दिला.
सचिनने दिला गुरुमंत्र
सचिन तेंडुलकर अनेक वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा मेंटॉर म्हणून संघासोबत आहे. सचिन म्हणाले, सनरायझर्सनी २७७ धावा केल्या असल्या तरी सामन्याच्या दुसऱ्या डावात १० षटके उलटून गेल्यानंतरही विजेता कोण असेल, हे कोणालाच कळत नव्हते. सामना कोणत्याही बाजूने जाऊ शकला असता. मुंबईने चांगली फलंदाजी केल्याचे हे संकेत आहेत. मुंबईला एकत्र राहण्याची गरज आहे. कारण पुढे आणखी कठीण गोष्टी असतील. एक गट म्हणून पुढे जाऊ आणि अडचणींवर मात करू.
हार्दिक पंड्यानेही वाढवला उत्साह
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने खेळाडूंना प्रोत्साहन देताना सांगितले की, सर्वोत्तम खेळाडूंना सर्वात कठीण परीक्षेतून जावे लागते. मुंबई लीगमधील सर्वोत्तम संघ आहोत. मुंबईने ज्या प्रकारे फलंदाजी आणि खेळ केला, ते मुंबई इंडियन्सशिवाय अन्य कोणताही संघ करू शकला नसता. मला माझ्या गोलंदाजांचा अभिमान आहे. आमच्यासाठी तो कठीण दिवस होता. पण परिस्थितीकडे कोणीही पाठ फिरवली नाही. गोलंदाजांची धुलाई होत असतानाही प्रत्येकाला गोलंदाजी करायची होती, ही चांगली गोष्ट आहे. पुढे कितीही अडचणी आल्या तरी एकमेकांना साथ द्यायला हवी.
हेही वाचा :
रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वेंचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द
‘नागरी सेवा परीक्षेसाठी पाच ते आठ वर्षांची तयारी म्हणजे तरुणांच्या ऊर्जेचा अपव्यय’
भारताशी शत्रुत्वानंतर एकेका थेंबासाठी मालदीव तहानलेले
सॅटेलाइटवरून कापला जाणार टोल; वेळेबरोबर इंधनाची होणार बचत
मुंबईचा पुढचा सामना कधी?
आयपीएल २०२४ मध्ये मुंबईने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. परंतु त्यांनी दोन्ही सामने गमावले आहेत. मुंबई संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध होईल. जो मुंबई त्यांच्या घरच्या मैदानावर खेळणार आहे. घरच्या चाहत्यांच्या पाठिंब्यामुळे मुंबई इंडियन्स आयपीएल २०२४ मध्ये विजयाचे खाते उघडू शकेल का, याची थोडी वाट पाहावी लागेल.