सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हीडिओ फिलिपिन्समधून झाला व्हायरल!

सायबर पोलिसांनी ई-मेल कंपनीशी संपर्क साधत मागितली माहिती

सचिन तेंडुलकरचा डीपफेक व्हीडिओ फिलिपिन्समधून झाला व्हायरल!

डीपफेक व्हिडिओची दहशत संपूर्ण जगभरात पसरली आहे.प्रतिष्ठित व्यक्ती, अभिनेते डीपफेक व्हिडिओला बळी पडत आहेत.मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचाही या यादीत समावेश झाला.तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो एका गेमिंग ॲपची जाहिरात करताना दिसत आहे.यासंदर्भात सचिन तेंडुलकर याने तक्रार दाखल केला होता.सचिन तेंडुलकरचा तो डीपफेक व्हिडीओ किंवा त्याची चित्रफीत ही फिलिपिन्समधून अपलोड झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

सचिन तेंडुलकरचा एक डीपफेक व्हिडीओ व्हायरल झाला होता.व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर एका गेमची जाहिरात करताना दिसत होता.तसेच या खेळातून कसा फायदा होतो हे देखील सांगण्यात आले होते.विशेष म्हणजे हा गेम खेळल्यामुळे सचिन यांची मुलगी सारा हीला देखील फायदा होत असल्याचे व्हिडिओमधून सांगण्यात आले होते.डीपफेक व्हिडिओबाबत सचिनला माहिती मिळताच त्याने आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला.

हे ही वाचा:

भारतात मुलाला मारल्यानंतर लंडनमध्ये मौजमजा

चादर, उशी आणि वॉशिंग मशिनमध्ये कपडे

शीना बोरा हत्येप्रकरणी नेटफ्लिक्सवर डॉक्युमेंट्री!

राबडीदेवीच्या गोशाळेतील कामगाराला लाच म्हणून मिळाली मालमत्ता

डीपफेक व्हिडिओ शेअर करत सचिन तेंडुलकरने लिहिलं की, “हा व्हिडीओ फेक आहे आणि फसवणुकीच्या हेतूने बनवला गेला आहे. तंत्रज्ञानाचा अशा प्रकारे वापर चुकीचा आहे. माझी तुम्हा सर्वांना अशी विनंती आहे की जाहिरातीत असा व्हिडीओ दिसला तर रिपोर्ट करा.”

दरम्यान, सचिन तेंडुलकरयांचा डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर.तेंडुलकरचे स्वीय सहाय्यक रमेश पारधे यांनी या घटनेची पश्चिम विभागीय सायबर पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानुसार तेंडुलकरांचा व्हिडिओ फिलिपिन्समधून अपलोड करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.तसेच सायबर पोलिसांनी ई-मेल कंपनीशी संपर्क साधला असून त्यांच्याकडून अधिक माहिती मागितली आहे.

Exit mobile version