सचिन तेंडुलकरकडे सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या एसआरपीएफ जवानाने राहत्या घरी आत्महत्या केली आहे.प्रकाश गोविंदा कापडे (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. जामनेर शहरातील जळगाव रोडवरील गणपती नगरमध्ये वास्तव्यास असलेल्या एसआरपीएफ जवानाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे.
प्रकाश कापडे एसआरपीएफमध्ये जवान म्हणून कार्यरत होते.क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचे बॉडीगार्ड म्हणून त्यांची ड्युटी लावण्यात आली होती.मिळालेल्या माहितीनुसार, जवान प्रकाश कापडे हे आठ दिवसांपासून जामनेर येथील आपल्या घरी आले होते.
हे ही वाचा:
संकुचित दृष्टिकोन नको, भारताने अमेरिकेला सुनावले
लिफ्टची साखळी तुटून कोलिहान खाणीत अडकलेल्या १४ जणांना वाचवले
“उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला फसवलं; काँग्रेसचा प्रचार करत नाहीत”
आज( १५ मे) पहाटे १ च्या सुमारास प्रकाश कापडे यांनी राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली.गोळीबाराचा आवाज ऐकून घरातील सदस्य धावून आले आणि समोर पाहिले तर जवान प्रकाश रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. हे दृश्य पाहून कुटुंबीय हादरून गेले.या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर व पुरेशा तपासानंतर कारण स्पष्ट होईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.प्रकाश कापडेयांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान,या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.