वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!

सचिनवर ५०व्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव

वीरेंदर सेहवागने सचिनला शीर्षासन करून म्हटले हॅप्पी बर्थडे पा जी!

भारताचा तडाखेबंद फलंदाज वीरेंदर सेहवाग आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांची जोडी म्हणजे कमाल होती. या जोडीने अनेक वर्षे क्रिकेटप्रेमींची मने जिंकली. सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवशी याच वीरेंदर सेहवागने मात्र एका अनोख्या पद्धतीने सचिनला शुभेच्छा दिल्या.

वीरेंदर सेहवागने २४ एप्रिलच्या मध्यरात्री १२.४५ वाजता सचिनला शुभेच्छा देत त्याला दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना केली. पण ती करताना सेहवाग चक्क उलटा झाला होता. त्याने शीर्षासनाच्या अवस्थेत सचिनला या शुभेच्छा दिल्या. ही अवस्था त्याने ट्विटच्या माध्यमातून चाहत्यांसमोर पेश केली. ट्विटमध्ये सेहवाग हा शीर्षासन अवस्थेत दिसतो आणि ते करत असतानाच तो शुभेच्छाही देतो. सेहवागने म्हटले की, पाजी तू मैदानात जे बोललास त्याच्या नेहमीच उलटे केलेस. त्यामुळे तुझ्या ५०व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी उलटे होऊनच शुभेच्छा देतो. तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आप जियो हजारो साल, साल के दिन हो एक करोड.

 

अमूल या दुग्धजन्य पदार्थांच्या ब्रँडनेही सचिनला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. sachincredible appetite असे लिहित एक व्हीडिओ पेश केला आहे. त्यात आतापर्यंत सचिनवर आधारित ज्या अमूल बटरच्या जाहिराती करण्यात आल्या त्यांची मालिका व्हीडिओत दिसते. नीचे क्रिकेट कप्तान उपर सचिन का मकान?… तेंडुल कार…सचिनला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून कार मिळाली तेव्हा त्याचे अमूलने अभिनंदन केले होते. डॉन ब्रॅडमन यांची जेव्हा सचिनने भेट घेतली तेव्हा अमूलने dono bradman अशा शब्दात त्याला शुभेच्छा दिल्या होत्या. सचिनने शतकांचे शतक पूर्ण केले तेव्हा sau chin Tendulkar अशा शब्दांत सचिनचे कौतुक केले होते. सचिनने निवृत्ती स्वीकारली तेव्हा sachin retires hurt असा संदेश देत सचिनला अलविदा केला होता.

हे ही वाचा:

येशू भेटण्याच्या अंधश्रद्धेतून केनियात २१ जणांचा मृत्यू

विश्वास नाही बसत?… गुजरातच्या पांचोट गावातील कुत्रे आहेत करोडपती !

चीनच्या समुद्रात बुडालेल्या जपानी जहाजाचा ८१ वर्षानंतर लागला शोध !

गेल्या ५० वर्षांत भारतामध्ये उष्माघातामुळे १७,०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही सचिनला शुभेच्छा देत त्याच्या कारकीर्दीतील १० महत्त्वाच्या आणि खास गोष्टी नमूद केल्या आहेत.

मुंबई इंडियन्सने सचिनला वेगळ्या शुभेच्छा देताना मुंबईच्या समुद्रात त्याचा बॅट उंचावलेल्या मुद्रेतला पुतळा उभारल्याचे चित्र शेअर केले आहे.

Exit mobile version