30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरविशेषमतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’

मतदानासाठी सचिन तेंडुलकर ‘नॅशनल आयकॉन’

मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून निवड

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा, भारताचे सर्वोच्च पदक असणाऱ्या भारतरत्न पुरस्काराने सन्मानित अशा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर आता अधिकाधिक मतदारांचा सहभाग वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

 

सन २०२४मध्ये अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, यासाठी निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची निवडणूक आयोगाचा ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून नियुक्ती केली आहे. बुधवारी याबाबतचा सामंजस्य करार होणार होता. मुख्य निवडणूक आयुक्त राजिव कुमार, निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांड्ये, अरुण गोएल यांच्यासह सचिन तेंडुलकर या करारावेळी उपस्थित असतील. हा करार तीन वर्षांचा असेल. या करारानुसार, सचिन मतदारांमध्ये जनजागृतीचे काम करणार आहे.

 

आगामी निवडणुकांमध्ये, विशेषत: २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी सचिनच्या तरुणांमधील लोकप्रियतेचा फायदा होणार आहे. प्रामुख्याने शहरी व युवकांमध्ये मतदानाविषयी असलेली उदासीनता कमी करण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे आयोगाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा:

रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरण बंद

अँटिलिया स्फोटके, मनसुख हत्याकांड प्रकरणी प्रदीप शर्माला जामीन मंजूर

झिम्बाब्वेचे माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांच्या निधनाच्या बातम्या खोट्या

गुजरातच्या तुरुंगात कैद्यांना आणि हिऱ्यांना पाडले जातात पैलू!

मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी निवडणूक आयोग विविध क्षेत्रांतील नामवंतांना ‘नॅशनल आयकॉन’ म्हणून घोषित करत असतो. मागील वर्षी अभिनेते पंकज त्रिपाठी, तर २०१९च्या लोकसभा निवडणुकीत एम. एस. धोनी, आमिर खान आणि मेरी कोम हे ‘नॅशनल आयकॉन’ होते.

 

 

सचिन तेंडुलकर याची सन २०१२ ते २०१८ या कालावधीत राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. मात्र त्याने या कालावधीत संसदेत केवळ आठ टक्के उपस्थिती दर्शवली. त्याने कोणत्याही चर्चेत सहभाग घेतला नाही आणि सहा वर्षांच्या कार्यकाळात केवळ २२ प्रश्न विचारले. मात्र त्याने त्याच्या खासदारनिधीचा चांगला विनियोग केला. जम्मू आणि काश्मीर, तमिळनाडूमधील पूरग्रस्तांना मदत करण्यासह उत्तराखंड आणि महाराष्ट्रात शालेय इमारतींच्या पुनर्बांधणीसाठी निधी दिला. तसेच, मुंबईत सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीसाठी मदत केली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा