24 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेष...असा मिळाला सचिनला त्याचा नवा पार्टनर!

…असा मिळाला सचिनला त्याचा नवा पार्टनर!

Google News Follow

Related

सचिन तेंडुलकर हा केवळ भारतातील नाही तर जगातील एक महान खेळाडू. भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या क्रिकेटच्या मैदानावरच्या काही पार्टनरशिप खूपच गाजल्या. मग कधी ती पार्टनरशिप वीरेंद्र सेहवाग सोबत असू दे किंवा सौरभ गांगुली सोबत. वैयक्तिक आयुष्यातही पत्नी अंजली सोबतची त्याची पार्टनरशिप उत्तमपणे सुरु आहे. पण अशा या सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात एक नवीन पार्टनर आला आहे.

दोन दिवसापूर्वी सचिनने इंस्टाग्राम वर या त्याच्या नव्या पार्टनरचा फोटो शेअर करून साऱ्यांना त्याच्याबद्दल सांगितले. सचिनचा हा नवा पार्टनर म्हणजे इतर कोणी नसून एक श्वान आहे स्पाईक नावाचा हा श्वान आपला नवा ‘पाॅ’टनर असल्याचे सचिनने म्हटले आहे.

हे ही वाचा:

ऑलिम्पिक पंचांविरोधात मेरी कोम मैदानात?

लोवलीनाचा बुक्का, मेडल पक्का

छत्रपती शिवरायांना आदर्श मानणाऱ्या योद्ध्यावर नवी वेब सिरिज

हसरंगाने भारताला रडवले…टी२० मालिकेवर लंकेची मोहर

सचिनने स्पाईक आपल्या आयुष्यात कसा आला याची एक रंजक कथाही त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी सचिनच्या फार्म हाऊसच्या केअर टेकरची मुले बाजारात गेली होती. त्यावेळी त्यांना हे छोटे कुत्र्याचे पिल्लू दिसले. पण त्याच वेळी त्यांनी हे देखील पाहिले की ते पिल्लू एकटे आहे. त्याची आई हयात नाही आणि ते पिल्लू खूपच घाबरले होते. अशा अवस्थेत ते त्या पिल्लाला घेऊन घरी आले आणि सचिनला ते पिल्लू दाखवले. त्या चार पायांच्या लहान निरागस जीवाने सचिनलाही भुरळ पाडली. त्या क्षणी सचिनने निर्णय घेतला की हा छोटासा स्पाईक आता आपल्या सोबत इथेच राहील, दुसरीकडे कुठेही जाणार नाही.

सचिनचा नवा ‘पॉ’टनर हा अस्सल भारतीय असा देशी कुत्रा आहे. अन्न, निवारा आणि प्रेम एवढ्याच त्याच्या गरजा आहेत असं सचिन म्हणतो. आमच्या आयुष्यात स्पाईक आल्यामुळे आमचे आयुष्य बदलले असा दावा सचिन तेंडुलकरने केला आहे.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा