सचिन तेंडुलकर यांनी सांगितले स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे फायदे

सचिन तेंडुलकर यांनी सांगितले स्थानिक क्रिकेट स्पर्धांचे फायदे

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी तरुण खेळाडूंना स्थानिक क्रिकेट स्पर्धांना प्राधान्य देण्याचा सल्ला दिला आहे.
सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफीच्या सामन्यांचा उल्लेख करताना त्यांनी त्यांच्या काळातील स्पर्धांचा उल्लेख केला. ‘रणजी ट्रॉफीची उपांत्य फेरी उत्कंठावर्धक होती. शानदार फलंदाजीच्या जोरावर मुंबईचा संघ अंतिम फेरीत धडकला आहे. तर, दुसरा उपांत्यफेरीचा सामना शेवटच्या दिवसापर्यंत लटकला आहे.

मध्य प्रदेशला जिंकण्यासाठी ९०हून अधिक धावांची आवश्यकता आहे. तर, विदर्भाला चार विकेट हव्या आहेत. मलाही माझ्या संपूर्ण क्रिकेट कारकिर्दीत जेव्हा जेव्हा संधी मिळायची, तेव्हा तेव्हा मी मुंबईसाठी खेळण्यास उत्सुक असायचो. तेव्हा तर ड्रेसिंग रूममध्ये भारतासाठी खेळणारे सात ते आठ खेळाडू असायचे. त्यांच्यासोबत खेळताना मजा यायची,’ असे सचिन तेंडुलकर यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.

हे ही वाचा :

ओडिशात भाजप-बिजू जनता दलाची आघाडी?

शेख शाहजहान याला सीबीआयकडे सोपवण्यास प. बंगालचा नकार

२०२३ च्या तुलनेत पंतप्रधान मोदींच्या अप्रूवल रेटिंगमध्ये १० टक्क्यांनी वाढ

‘मेटा’ ठप्प झाल्यामुळे कंपनीला १०० मिलियन डॉलर्सचं नुकसान

‘जेव्हा देशासाठी खेळणारे खेळाडू स्थानिक संघासाठी खेळतात, तेव्हा तरुणांच्या खेळांची गुणवत्ता वाढते आणि कधी कधी स्वतःमधल्याच नव्या गुणवत्तेची पारख होते. हे सामने खेळल्यामुळे राष्ट्रीयस्तरावरील खेळाडूंनाही कधी कधी मूलभूत गोष्टी पुन्हा शोधण्याची संधी मिळते. स्थानिक स्पर्धांमध्ये आघाडीच्या खेळाडूंनी सहभाग घेतल्यास कालांतराने इतरही स्वतःच्या स्थानिक स्पर्धांना महत्त्व देण्यास आणि समर्थन करण्यास सुरुवात करतील. बीसीसीआय स्थानिक संघांनाही सारखे प्राधान्य देत आहे, हे खरेच लक्षणीय आहे,’ असेही तेंडुलकर म्हणाले.

Exit mobile version