सचिनला डिस्चार्ज मिळाला

सचिनला डिस्चार्ज मिळाला

भारताचा विक्रमवीर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोनावर मात करुन घरी परतला आहे. २७ मार्चला सचिनची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार सावधगिरीचा उपाय म्हणून सचिन हॉस्पिटलमध्ये भरती झाला होता. आज सचिन तेंडुलकरला डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत त्याने ट्वीट करत माहिती दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्यावर तो घरातच क्वारंटाईन होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र २ एप्रिल रोजी ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं सांगितलं. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या.

हे ही वाचा:

अनिल परबांनी राजीनामा द्यावा

महावितरणने पुन्हा दिवे लावले

मुंबई लोकल पुन्हा बंद?

सर्वोच्च न्यायालयाकडूनही अनिल देशमुखांना चपराक

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला २७ मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Exit mobile version