कोरोनाची लागण झाल्यावर सचिन रुग्णालयात दाखल

कोरोनाची लागण झाल्यावर सचिन रुग्णालयात दाखल

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला रुग्णालयात भरती केलं आहे. सचिनला २७ मार्च रोजी कोरोनाची लागण झाली होती. मात्र पुढील उपचारांसाठी मी रुग्णालयात दाखल होत आहे, अशी माहिती त्याने ट्विट करुन दिली आहे.

कोरोनाची लागण झाल्यावर तो घरातच क्वारंटाईन होता. तसंच डॉक्टरांच्या सल्ल्यांनुसार त्याच्यावर औषधोपचार सुरु होते. मात्र आज ट्विट करत त्याने आपण रुग्णालयात दाखल होत असल्याचं सांगितलं आहे. सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाल्यानंतर जगभरातील त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या. आजच्या ट्विटच्या माध्यमातून सचिनने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला २७ मार्चला कोरोनाची लागण झाली. स्वत: सचिन तेंडुलकरने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली होती. मला सौम्य लक्षणे आढळली असून, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं होतं. दरम्यान, सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीदेखील कोरोना चाचणी केली असून त्यात सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

हे ही वाचा:

अँटिलिया स्फोटके प्रकरणातील मिस्ट्री वुमन ताब्यात, सचिन वाझेसमोरच्या अडचणी वाढणार?

बंगाली दीदी विरुद्ध बिहारी बाबू

आता जम्मू-काश्मीरमध्येही ‘गोविंदा-गोविंदा’

आज भारतीय संघाने वर्ल्ड कप जिंकून बरोबर १० वर्ष पूर्ण होत आहेत. याच संघाचा सचिन एक भाग होता. याच दिवसाचं निमित्त साधून सचिनने संपूर्ण भारतवासियांना तसंच संघ सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version