अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले

सुदैवाने जीवितहानी झालेली नाही

अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेसला अपघात; मालगाडीला धडकून चार डबे रुळावरून घसरले

राजस्थानमधील अजमेर येथे रेल्वे अपघात झाल्याची माहिती आहे. साबरमती एक्सप्रेस आणि एका मालगाडीमध्ये भीषण धडक झाली आहे. या अपघातात साबरमती एक्सप्रेसचे काही डबे रूळावरून खाली घसरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच रेल्वे रूळावरून दोन गाड्या आल्याने ही घटना घडली आहे. घसरलेल्या रेल्वेच्या डब्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले आहे.

राजस्थानच्या अजमेरमधील मदार रेल्वे स्थानकाजवळ साबरमती आग्रा केंट सुपर फास्ट एक्स्प्रेस आणि एक माल गाडी एकाच रुळावर आले. रात्री १ वाजून १० मिनिटाच्या सुमारास हा अपघात झाला. दोन्ही गाड्या एकाच रुळावर आल्याचे लक्षात येताच दोन्ही गाड्यांच्या लोको पायलटने इमर्जन्सी ब्रेक लावला. मात्र, साबरमती एक्स्प्रेसचा वेग अधिक असल्याने ती मालगाडीला धडकली. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये हजारो प्रवासी प्रवास करत होते. धडक होताच साबरमती एक्स्प्रेसचे इंजिनसह चार डबे रुळावरून घसरले. ट्रेन रुळावरून घसरली आणी त्याचबरोबर विजेच्या खांबाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून मदतकार्य सुरू केले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेनंतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अजमेर रेल्वे स्थानकातून रात्री १२.५५ च्या सुमारास निघाली आणि काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी ट्रेनमध्ये बसलेल्या लोकांना जबर धक्का बसला. या धक्क्याने सीटवर झोपलेले प्रवासी सीटवरून खाली पडले. अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने प्रवाशांनीही नाराजी व्यक्त केली.

हे ही वाचा:

हिमांशू, ओजस्वीने जिंकली सुवर्णपदके

सीएए : खोटे दावे आणि वास्तव

‘मी पुन्हा येईन म्हटलं’…आलो अन येताना दोन पक्ष फोडून आलो!

यूट्यूबर एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी केली अटक!

यानंतर काही प्रवासी पायी शहराकडे रवाना झाले. तर, उर्वरित प्रवाशांना वेगळ्या गाडीतून पुढे रवान करण्यात आले. सध्या अपघाताच्या कारणांचा शोध सुरू असून रेल्वे ट्रॅक व्यवस्थित करण्याचे काम सुरू आहे.

Exit mobile version