केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पावसाचा व्यत्यय

केएल राहुलने भारताचा खेळ सावरला!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच कसोटीतीव पहिलाच दिवस भारतासाठी आव्हानात्मक ठरला. सर्व भारतीय खेळाडू एकापाठोपाठ बाद होत असताना केएल राहुलने ७० धावा खेळून खेळ सावरला. भारताच्या आठ विकेट बाद २०८ धावा झाल्यानंतर ‘बॉक्सिंग डे’ म्हणवल्या जाणाऱ्या या दिवशी पावसाने खेळ थांबवल्याने ही पडझड थांबली. तर, दक्षिण आफ्रिकेच्या कागिसो राबाडा यने पाच विकेट घेऊन भारतीयांचे मनसुबे उधळून लावले.

पावसाच्या व्यत्ययामुळे मंगळवारी दिवसभरात केवळ ५९ षटकांचाच खेळ होऊ शकला. केएल राहुलने ७० धावा केल्याने भारताची मजल २०० पुढे जाऊ शकली. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या बॅटची करामत दाखवण्यात अपयशी ठरले मात्र राहुलने सर्वशक्तिनिशी किल्ला लढवला. आता २५०च्या पुढे धावसंख्येची मजल गाठण्यासाठी राहुलला मोहम्मद सिराज आणि आर अश्विन यांची साथ आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वतीने कागिसो राबाडा याने पाच विकेट टिपल्या. या कामगिरीमुळे ५०० आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा तो सातवा दक्षिण आफ्रिकी गोलंदाज ठरला.

हे ही वाचा:

महाराष्ट्रात गुंतवणूक आली पण आदित्य ठाकरेंना नाही कळली !

जय श्रीराम: उत्तराखंडमधून १५०० रामभक्त येणार अयोध्येत!

आरबीआयसह ११ बँकांना उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल!

कटू आठवणी विसरून विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालाय सज्ज!

भारतीय संघाची अवस्था चार विकेट गमावून ९२ झाली असताना राहुल मैदानावर उतरला. तेव्हा विराट कोहली मैदानावर होता. मात्र कागिसो राबाडा याने विराट कोहलीची विकेट घेतली. तत्पूर्वी अय्यर आणि कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी रचली. फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिल्या दोन कसोट्यांनंतर केएल राहुलला संघातून वगळण्यात आले होते.

मात्र त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केल्यानंतर त्याला कसोटी संघात ११ खेळाडूंत पुन्हा स्थान देण्यात आले. शुभमन गिल आणि यशस्वी जयस्वालही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. ते अस्वस्थ असल्याचे त्यांच्या मैदानावरील हालचालींतून दिसून येत होते. दोघांनाही दक्षिण आफ्रिकेच्या नांद्रे बर्गर याने तंबूत पाठवले. विराट कोहलीने ६४ चेंडूंमध्ये ३४ धावा करून संयमी खेळाचे प्रदर्शन केले. श्रेयस अय्यरनेही त्याला छान साथ दिली. मात्र दोघांनाही रबाडा याने बाद करून भारताच्या संघाला सुरुंग लावला.

Exit mobile version