प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रिदवाक्य मिरवणारी आमची लालपरी. मात्र प्रवाशांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या आपल्या एसटी महामंडळाचे कर्मचाऱ्यांची कित्येक ठिकाणी गैरसोय होत असल्याचे चित्र आहे. रात्रवस्तीसाठी जाणाऱ्या बसेचच्या चालक आणि वाहक यांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची सोयी नसल्याबाबत तक्रारी आल्या होत्या. या सोयीसुविधा बऱ्याच गावात उपलब्ध होत नाहीयेत. परिणामी वाहक, चालक यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. त्यामुळे बऱ्याचदा अपघातांना आमंत्रण मिळत आहे.
या तक्रारीनंतर महाव्यवस्थापकांनी पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. आगार व्यवस्थपकांनी रात्रवस्तीसाठी बसेस ज्या गावात जातात, त्या गावांना भेट द्यावी. तसेच सरपंचाना पत्रव्यवहार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच विभाग नियंत्रक यांनी संबंधित जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी पत्र व्यवहार करणे व त्यांची भेट घेण्यास सांगितले आहे. रात्रवस्तीसाठी जाणाऱ्या बसेचच्या चालक आणि वाहकांच्या राहण्याची, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची व्यवस्था करून देण्यात यावी, असेही कळविण्यात आले आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रात पाच वर्षांनंतर दिसले पाणपक्षी
राजकीय सूडभावना नाही, सगळी कारवाई पारदर्शक पद्धतीनेच होईल
आंतरराष्ट्रीय विमानतळावर ६१ किलो सोन्याची जप्ती
महिलांना ढकलून देण्याची परंपरा आहे का
रात्रवस्तीला जे चालक वाहक असतात त्यांच्या सुविधांबद्दल प्रशासन अजूनही उदासीन आहे. त्यात फार सुधारणा दिसत नाही. अनेक ठिकाणी ग्रामपंचायत तसेच जिल्हा परिषद शाळेमध्ये चालक आणि वाहक यांच्या झोपण्याची व्यवस्था होत नाही. कोकणात काही ठिकाणी देवळात झोपावे लागते, सापाचे दर्शनही होते. अनेकवेळा एसटीतच झोपावे लागते. पूर्वीच्या गाड्यांमध्ये झोपता येत होते. तशा त्यावेळी आसनाची व्यवस्था होती. आता नवीन गाड्यांच्या आसन व्यवस्थेत बदल झालेत. थंडीच्या मोसमात तर अतोनात हाल होतात. रात्री ताज्या जेवणासह, वैयक्तिक स्वच्छता व पुरेशी झोप घेण्यास संघर्ष करावा लागत आहे.
उघड्यावर करावी लागते आंघोळ, शौचालयासही अडचण
ग्रामीण भागात मुक्कामी असलेल्या चालक, वाहकांना हक्काचा निवारा नसल्याने सार्वजनिक नळावरच आंघोळ करावी लागतेय. अनेक ठिकाणी शौचालयाची व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागतो. कित्येकदा गावकऱ्यांच्या घरात सोय करावी लागते.