क्रिकेटपटू एस श्रीशांतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

स्पोर्ट्स अकादमी बांधणार असल्याचे सांगत केली फसवणूक,तक्रारदाराचा आरोप

क्रिकेटपटू एस श्रीशांतवर फसवणुकीचा गुन्हा दाखल!

क्रिकेटपटू एस श्रीशांत , राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.उत्तर केरळ जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपली फसवणूक केल्याच्या तक्रारी नंतर एस श्रीशांतसह अन्य दोघांवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारदार चुंडा येथील रहिवासी असून त्याने आरोप केला आहे की, आरोपी राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांनी २५ एप्रिल २०१९ पासून कर्नाटकातील कोल्लूर येथे स्पोर्ट्स अकादमी बांधणार असल्याचे सांगून विविध तारखांना १८.७० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे, ज्यामध्ये श्रीशांत हा सुद्धा भागीदारआहे.

हे ही वाचा:

जम्मू काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या!

ब्रिक्स सदस्यत्वासाठी पाकिस्तानचा अर्ज!

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी संबंध; चार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी!

मुख्याध्यापकावर १४२ विद्यार्थीनींनी केला लैंगिक छळाचा आरोप!

तक्रारदार सरेश गोपालनने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, अकादमीमध्ये भागीदार बनण्याची संधी मिळेल या अपेक्षेने पैसे गुंतवल्याचे त्याने सांगितले.त्यानुसार श्रीशांतसह ,राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी यांच्यावर आयपीसी कलम ४२० (फसवणूक आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,

या प्रकरणात राजीव कुमार आणि व्यंकटेश किणी या दोघांचा समावेश आहे तर तिसरा भागीदार म्हणून एस श्रीशांत याचे नाव आहे.त्यानुसार फसवणूक केल्या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Exit mobile version