लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

२००७मध्ये लिहिली होती आवरण कादंबरी

लव्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

‘आवरण’ प्रसिद्ध कादंबरीच्या माध्यमातून एकप्रकारे लव्ह जिहादची नेमक्या संकल्पनेवर बोट ठेवणारे सिद्धहस्त लेखक एस. एल. भैरप्पा यांना केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. २००७मध्ये त्यांची ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. या कादंबरीतील मुख्य पात्र लक्ष्मी हे बंडखोर प्रवृत्तीची स्त्री असून ती विचारवंत आहे आणि फिल्ममेकर आहे. तिचा विवाह आमीर या तरुणाशी होतो. या कथेत तिला धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केले जाते पण ती त्यासाठी तयार नसते. पण तिला ते व्हावे लागते. लक्ष्मीची रझिया बनते. त्यानंतर तिला लक्षात येऊ लागते की, आमीर हा मोकळ्या मनाचा नाही, पुढारलेल्या विचारांचा नाही. आमीर हा आपल्या कुटुंबाच्या अपेक्षेप्रमाणे तिला धर्मांतरित करतो.

ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर ती वादात सापडली होती. स्वाभाविकच भैरप्पा हे समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत, असे आरोपही झाले. पण कालांतराने त्यांनी जे उदाहरण दिले तशी समाजात अनेक उदाहरणे आहेत, हे लक्षात येऊ लागले. लव्ह जिहाद ही संकल्पना अनेकांना मान्य नसली तरी ती आहे हे पटू लागले.

डॉ. संतेशिवारा लिंगनय्या भैरप्पा तथा एस.एल. भैरप्पा हे कन्नड कादंबरीकार असून त्यांनी आतापर्यंत २४ कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. कन्नड लेखकांपैकी सर्वाधिक खपाची पुस्तके लिहिणारे लेखक ही त्यांची ओळख आहे. त्यांनी २०१५मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच २०१६मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. सहा विद्यापीठांतून त्यांनी डॉक्टरेट ही पदवी प्रदान करण्यात आली आहे. विविध प्रादेशिक भाषांत त्यांची पुस्तके भाषांतरित करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

सुप्रियाताईंनी पुन्हा एकदा गझनी सिनेमा पाहावा

१०६ जणांना पद्म पुरस्कार.. जाणून घ्या कोण मानकरी

सुखोई, राफेलसह ५० विमानांचा अवकाशात थरार

७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा खास पेहराव

मागे एका जाहिरातीच्या माध्यमातून प्रचंड टीका झाली होती. त्यावेळीही भैरप्पा यांच्या या आवरण कादंबरीतील लक्ष्मी या पात्राची आठवण काढली गेली होती. त्या जाहिरातीत एक हिंदू मुलगी मुस्लिम कुटुंबात विवाह होऊन येते. पण तिथे तिची सासू ही उदारमतवादी असल्याचे दाखविले आहे. त्यावर प्रतिक्रिया उमटल्या होत्या की, असे फक्त जाहिरातीतच दिसते. भैरप्पा यांच्या आवरण या कादंबरीतील लक्ष्मी तथा रझियाच्या सासूप्रमाणेच वास्तवात स्थिती असते.

Exit mobile version