ऋतुराज चेन्नई सुपरचा नवा किंग

ऋतुराज चेन्नई सुपरचा नवा किंग

आयपीएल २०२४ ची रणधुमाळी उद्यापासून सुरू होत आहे. पण त्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने आपल्या संघात मोठा बदल करून जोर का झटका दिलेला आहे. सीएसकेने ऋतुराज गायकवाडला चेन्नई सुपर किंग्जचा नवा कर्णधार म्हणून घोषित केले आहे. या निर्णयामुळे महेंद्रसिंग धोनी चेन्नईचे नेतृत्व करताना दिसणार नाही. धोनी बराच काळ संघाचा कर्णधार होता. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच वेळा विजेतेपदही पटकावले आहे. धोनीचा कर्णधारपदाबरोबरच फलंदाजीतही चांगला रेकॉर्ड आहे.

या निर्णयामुळे आयपीएलच्या आधी धोनीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. धोनीने चेन्नई सुपर किंग्जच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. संघाची धुरा ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर टाकली आहे. ऋतुराज हा प्रतिभावान खेळाडू आहे. त्यामुळे व्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

धोनी आयपीएल २००८ पासून संघासोबत आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. सीएसकेने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. गेल्या मोसमात सीएसकेने अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केला होता. चेन्नईने हा सामना ५ गडी राखून जिंकला.

चेन्नई सुपर किंग्जने संघाच्या कर्णधारपदाबाबत एक निवेदन जारी केले आहे. सीएसकेने म्हटले आहे की, महेंद्रसिंह धोनीने आयपीएल २०२४ पूर्वी संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपवले आहे. ऋतुराज २०१९ पासून संघाशी जोडला गेला आहे. त्याने आतापर्यंत ५२ सामने खेळले आहेत.

हेही वाचा :

राहुल गांधींची भूमिका इंदिरा आणि राजीव गांधी यांच्या भूमिकेशी विसंगत

काँग्रेसला झटका; हिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांची लोकसभा निवडणुकीतून माघार

जयपूर: घराला भीषण आग लागल्याने ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू!

हिंगोली, नांदेड अन् परभणीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के!

ऋतुराजची आयपीएल कामगिरी?


ऋतुराजची आयपीएल कामगिरी आतापर्यंत उंचावणारी आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ५२ सामन्यात १७९७ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १ शतक आणि १४ अर्धशतके झळकावली आहेत. ऋतुराजची आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्या १०१ धावांची आहे. गेल्या मोसमात त्याने १६ सामन्यांत ५९० धावा केल्या होत्या. ऋतुराजची यंदाच्या मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या ९२ धावांची होती. ऋतुराज ने २०२० मध्ये पहिला आयपीएल सामना खेळला होता. या मोसमात त्याला ६ सामने खेळण्याची संधी मिळाली.

Exit mobile version