विंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघात मुंबई-महाराष्ट्र

कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून मुंबईच्या अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शार्दुल ठाकूर हादेखील कसोटी व वनडे अशा दोन्ही संघात

विंडीज दौऱ्यासाठी कसोटी संघात मुंबई-महाराष्ट्र

आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ जाहीर झाला असून या संघात मुंबई आणि महाराष्ट्राचे खेळाडू मोठ्या संख्येने आहेत. महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड याला प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले असून मुंबईचा यशस्वी जयस्वालही प्रथमच या संघात खेळणार आहे. तर कसोटी संघाचा उपकर्णधार म्हणून मुंबईच्या अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी देण्यात आली आहे. शार्दुल ठाकूर हादेखील कसोटी व वनडे अशा दोन्ही संघात आहे. मुंबईचा तडाखेबंद फलंदाज सूर्यकुमार यादव वनडे संघात आहे.  मुंबईचा रोहित शर्मा दोन्ही संघांचा कर्णधार आहे. त्यामुळे एकूणच या संघावर मुंबई महाराष्ट्राची छाप असल्याचे दिसते.

 

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्यात ज्याची उणीव भासली असा फिरकीपटू आर. अश्विनलाही संघात स्थान देण्यात आले आहे. तर चेतेश्वर पुजाराला मात्र बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांना प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. विंडीज दौऱ्यातील वनडे सामन्यांसाठी उमरान मलिक आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन यांना संधी मिळाली आहे.

 

भारतीय क्रिकेट बोर्डाने शुक्रवारी या दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. कसोटी आणि वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा याच्याकडे कर्णधारपद असेल. कसोटीसाठी उपकर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ऋतुराज गायकवाड आणि यशस्वी जयस्वाल यांनी प्रथमच कसोटी संघात स्थान मिळविले आहे. यशस्वीला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी राखीव ठेवण्यात आले होते. कसोटी संघात गोलंदाज मुकेश कुमार आणि नवदीप सैनी यांनाही संधी मिळाली आहे. मोहम्मद शमीला वनडे आणि कसोटीसाठी आराम देण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड, जयदेव उनाडकट आणि मुकेश कुमार हे वनडे संघातही आहेत.

हे ही वाचा:

मध्य प्रदेशातील “मोस्ट वॉन्टेड’ लंगूर माकडाला चार तासांच्या शोधमोहिमेनंतर पकडले

पाटण्यामधील बैठक ही ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक

महाराष्ट्र उबाठाला थेट विचारतोय… म्हणत आशिष शेलारांचे ठाकरेंना सवाल

‘भारतात भेदभावासाठी जागा नाही’

 

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयस्वाल, के.एस. भरत, इशान किशन, आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.

 

वनडे संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, शार्दुल ठाकूर, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, यजुर्वेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

विंडीज दौरा असा असेल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात १२ जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल.

पहिली कसोटी १२ ते १६ जुलै डॉमिनिका

दुसरी कसोटी २० ते २४ जुलै पोर्ट ऑफ स्पेन

पहिली वनडे २७ जुलै (ब्रिजटाऊन)

दुसरी वनडे २९ जुलै (ब्रिजटाऊन)

तिसरी वनडे १ ऑगस्ट (पोर्ट ऑफ स्पेन)

पहिली टी-२० ३ ऑगस्ट (पोर्ट ऑफ स्पेन)

दुसरी टी-२० ६ ऑगस्ट गयाना

तिसरी टी-२० ८ ऑगस्ट गयाना

चौथी टी २०  १२ ऑगस्ट फ्लोरिडा

पाचवी टी-२० १३ ऑगस्ट फ्लोरिडा

 

 

Exit mobile version