महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या नव्या लोगोचे सोमवारी (१२ ऑगस्ट) अनावरण करण्यात आले आहे. या नव्या लोगोमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पाहायला मिळत आहे. तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या पुण्यातील नव्या कार्यालयाचेही यावेळी उदघाटन करण्यात आले. विविध मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या जुन्या लोगोमध्ये एका किल्ल्याची प्रतिमा, आणि त्यामध्ये बाजूला दोन बाण असलेले बॅच आकाराचे बोधचिन्ह होते. आता यामध्ये बदल करून भगव्या पार्श्वभूमीत छत्रपती शिवाजी महाराजांचा छायांकित फोटो असलेला अष्टकोनी लोगो तयार करण्यात आला आहे. तसेच नव्या लोगोमध्ये दोन बॅट्स आणि एक बॉलही दाखवण्यात आला आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशच्या नव्या लोगोचे अनावरण आणि नव्या ऑफिसचे उदघाटन जेष्ठ नेते आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष शरद पवार बीसीसीआयचे खजिनदार ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲपेक्स बॉडी सदस्य, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहितदादा पवार, माजी क्रिकेटर चंदू बोर्डे , क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाड, महाराष्ट्राचे आजी-माजी क्रिकेटपटू तसेच एमसीएचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते. यासह महाराष्ट्राच्या महिला खेळाडूही यावेळी उपस्थित होत्या.
हे ही वाचा:
ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना २०२४ चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर
विदर्भ- मराठवाड्यात घडणार नवी दुधक्रांती
पाकिस्तानच्या ऑलिम्पिकवीर अर्शद नदीमचे लष्कर-ए-तैयबाचा दहशतवाद्याबरोबर फोटो
नगराध्यक्षांचा कार्यकाळ आता अडीच ऐवजी पाच वर्षांचा
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशने नव्या लोगोचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये १९३४ साली स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशचा लोगो दाखवण्यात आला असून त्यानंतर नवा लोगो हा आठ नैतिक मूल्यांशी निगडित असल्याचे दाखवले आहे. नवा लोगो हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवमुद्रेच्या आकाराप्रमाणे असून यामध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा आहे.
महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या नव्या लोगोचे अनावरण आयसीसी व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रिय मंत्री शरद पवार साहेब, बीसीसीआयचे खजिनदार आशिषजी शेलार, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष रोहितदादा पवार व ॲपेक्स बॅाडी सदस्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी क्रिकेटर चंदू बोर्डे… pic.twitter.com/ajRurLlXF7
— Maharashtra Cricket Association (@MahaCricket) August 12, 2024